Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arun Gawali: दाऊद इब्राहिमला भिडला, ‘अंडरवर्ल्ड डॉन’ बनला; आता निवडणुकीत करणार दोन हात; मुंबईच्या ‘डॅडीं’चा नवा प्लॅन

दाऊद इब्राहिमच्या अंडरवर्ल्डशी थेट सामना करून मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये आपली ओळख निर्माण केलेल्या अरुण गवळी १७ वर्षांनी परत येत आहेत. त्यांच्या परतीनंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर मुंबईत फुलांचा वर्षाव होत आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 28, 2025 | 06:08 PM
Arun Gawali: दाऊद इब्राहिमला भिडला, ‘अंडरवर्ल्ड डॉन’ बनला; आता निवडणुकीत करणार दोन हात;  मुंबईच्या ‘डॅडीं’चा नवा प्लॅन
Follow Us
Close
Follow Us:
  • बीएमसी निवडणुकीत अरुण गवळींची चर्चा
  • अरुण गवळींच्या दोन मुली निवडणुकीच्या रिंगणात
  • डॅडींमुळे मुलींना होणार फायदा

Arun Gawali News:  राज्यात २०१७ पासून जवळजवळ आठ वर्षांच्या अंतरानंतर होणाऱ्या मुंबई महापालिका (बीएमसी) निवडणूक होणार आहे.  या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  मुंबईतून एक महत्त्वाची अपडेट समोर  आली आहे.  अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईचे ‘डॅडी’ अशी ओळख असलेल्या अरुण गवळींच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.  १७ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर अरूणम गवळी आता मुंबईतील त्यांच्या दगडी चाळीत सक्रिय झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुकांसाठी अंतिम मुदत दिली आहे. त्यानुसार मुंबईसह राज्यभरात महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण गवळी स्वतः सक्रिय राजकारणात भाग घेणार नाहीत, परंतु त्यांच्या दोन मुली – माजी नगरसेवक गीता आणि वकील योगिता – या निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर  आली आहे. अरूण गवळींचा  अखिल भारतीय सेना  हा पक्ष  या निवडणुकीत सक्रिय राहणार आहे.

TVK in High Court :”ही दुर्घटना नाही तर हा पूर्वनियोजित कट; करूर चेंगराचेंगरी प्रकरणात विजयच्या TVK पक्षाची हाय कोर्टात धाव

  दाऊद इब्राहिमला भिडला

भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम याला आव्हान देणारा  अरूण  गवळी हा एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जवळचा मानला जात असे. दगडी चाळ आणि आसपासच्या परिसरात अरुण गवळी यांचा प्रभाव अजूनही दिसून येतो. म्हणूनच विधानसभेत पोहोचणारा तो मुंबईतील एकमेव मोठा गुंड आहे.

अरूण  गवळी यांच्या दोन्ही मुली निवडणूक लढवत असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर  डॅडी यांनी अलीकडेच गणेशोत्सवात भाग घेतला, जिथे त्यांनी पारंपारिकरित्या हात वर करून समर्थकांचे स्वागत केले. अरुण गवळी आता त्यांची पूर्ण शिक्षा भोगत असल्याने आणि सार्वजनिकरित्या सक्रिय असल्याने त्यांच्या मुलींना त्याचा फायदा होऊ शकतो, असा विश्वास राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

BCCI कडून निवड समितीत मोठे बदल! प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

दाऊद इब्राहिमच्या अंडरवर्ल्डशी थेट सामना करून मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये आपली ओळख निर्माण केलेल्या अरुण गवळी १७ वर्षांनी परत येत आहेत. त्यांच्या परतीनंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर मुंबईत फुलांचा वर्षाव होत आहे.

मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीची चर्चा वाढत असताना, गवळींच्या दगडी चाळीतही तयारी सुरू झाली आहे. अरुण गवळींची पार्टी, अखिल भारतीय सेना (एबीएस), बीएमसी निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे. माजी नगरसेविका गीता यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे, तर दुसरी मुलगी योगिता हिनेही राजकारणात प्रवेश करण्याचा इरादा जाहीर केला आहे.

काही काळापूर्वी अरुण गवळीची मेहुणी वंदना हिने शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला होता. सध्याच्या चर्चेनुसार, योगिता बीएमसी वॉर्ड क्रमांक २०७ मधून निवडणूक लढवू शकते, तर गीता वॉर्ड क्रमांक २१२ मधून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे.

Web Title: Arun gawali will contest the mumbai municipal corporation elections and increase the headaches of political parties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • BMC Election

संबंधित बातम्या

मुंबई महापालिकेत ‘दगडी चाळी’चा दबदबा? ‘डॅडीं’ची लेक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
1

मुंबई महापालिकेत ‘दगडी चाळी’चा दबदबा? ‘डॅडीं’ची लेक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र
2

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार
3

आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार

BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार? प्रशासनाच्या हालचाली सुरू
4

BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार? प्रशासनाच्या हालचाली सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.