Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayush Komkar Murder Case: ‘मीच माझ्या नातवाचा खून का करेल? मला यात अडकवलं गेलयं ‘; बंडू आंदेकरने कोर्टात इतिहासच सांगितला

आयुष कोमकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या बंडू आंदेकर यांच्यावतीने वकिलांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. " गेल्या 10 तासांपासून आम्हाला अटक करण्यात आली आहे. जी FIR झाली तीदेखील चुकीची आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 10, 2025 | 12:49 PM
Ayush Komkar Murder Case:

Ayush Komkar Murder Case:

Follow Us
Close
Follow Us:
  • आयुष कोमकर हत्याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक
  • आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातयं- बंडू आंदेकर
  • मी माझ्याच नातवाचा खून का करेल मला काय मिळणार आहे – बंडू आंदेकर

Pune Crime News : आयुष कोमकर हत्याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक कऱण्यात आली आहे. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरातील नाना पेठ परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणी वेळी तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. तर दुसरीकडे, बंडू आंदेकर यांच्या वतीनेही वकिलांनी पोलिस कोठडीला विरोध दर्शवला. “गुन्हा घडला त्या दिवशी बंडू आंदेकर घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यांना या प्रकरणात खोटेपणाने गोवण्यात आल्याचा” युक्तिवाद त्यांनी केला. तसेच, बंडू आंदेकर यांनीही न्यायालयात आपलं नाव जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा दावा केला.

पण, सरकारी वकिलांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी बंडू आंदेकरसह इतर आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सर्व सहा आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. गणेश कोमकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु या 6 आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

VP Election of India: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कुणाची मते फुटली? महाराष्ट्रासह या राज्यांतील खासदारांवर संशय

बंडू आंदेकर कोर्टात काय म्हणाला?

बंडू आंदेकरने न्यायलया आपली बाजू मांडली. “आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातयं. ज्यावेळी ही हत्या घडली, त्यावेळी आम्ही केरळला होतो. पोलिसांच्या विरोधात आमची कोणतीही तक्रार नाही, पण आम्हाला अडकवलं जात आहे.” असा दावा त्यांनी यावेळी केला. दुसरीकडे, तपास अधिकाऱ्यांनीदेखील या प्रकरणाची महत्त्वाची माहिती न्यायालयात सादर केली.

आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद काय?

आयुष कोमकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या बंडू आंदेकर यांच्यावतीने वकिलांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. ” गेल्या 10 तासांपासून आम्हाला अटक करण्यात आली आहे. जी FIR झाली तीदेखील चुकीची आहे. माझी मुलगी कल्याणी हिनेच याबाबतची फिर्याद दिली आहे. मरण पावलेला माझाच नातू आहे. मग आमची नावे का आली, गेल्या वर्षी माझ्या मुलाचा खून झाला होता. त्यात मी फिर्याद दिली होती. त्यावेळीही मी सांगितलं होतं की कल्याणीनेही कट रचला होता. तिच्या घरच्यांनाही अटक कऱण्यात आली आहे.

नेपाळला आगीच्या भट्टीत रूपांतरित करतानाचा ‘हा’ 51 सेकंदांचा ड्रोन VIDEO पहा; नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले

आयुष कोमकर माझा नातू होता. मग मी माझ्याच नातवाचा खून का करेल मला काय मिळणार आहे. आयुष माझा वैरी होता का, असा प्रश्नही बंडू आंदेकरांनी उपस्थित केला. तसेच मला मारायचंच असतं तर मी माझ्या प्रतिस्पर्ध्याला मारेल, वनराजचे खूप चाहते खूप आहेत. त्यांपैकी कुणी मारलं असावं, असंही बंडू आंदेकरांनी यावेळी स्पष्ट केलं. “मी फिर्यादीच्या पतीचे, सासऱ्याचे आणि नवऱ्याचे नाव घेतल्यामुळे माझंही नाव यात गोवण्यात आलं. माझ्या मुलाच्या खून प्रकरणी मी तिच्या घरच्यांना तुरुंगात पाठवलं, म्हणून माझं संपूर्ण कुटुंब तुरुंगात पाठवायचं, हा यामागचा उद्देश आहे, असंही बंडू आंदेकरांनी न्यायालात सांगितलं.

“दत्ता काळे याने माझं नाव घेतलेले नसतानाही खोटा फिर्यादी बनवून आम्हाला यात ओढलं जात आहे. आमचे घरगुती वाद असल्यामुळे आमची नावे यात गोवली गेली आहेत. आम्ही राज्यात नव्हतो, आम्ही केरळमध्ये होतो. त्यामुळे कट रचण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्याकडून पिस्तूल जप्त कसं करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, “वृंदावनी आंदेकर यांना सूर्यास्तानंतर अटक करण्यात आली असून, त्यावेळी कोणतीही महिला पोलिस अधिकारी उपस्थित नव्हती. ही अटक नियमबाह्य आहे,” अशी तक्रारही केली.

 

Web Title: Ayush komkar murder case why would i kill my grandson i have been implicated in this bandu andekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 12:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.