अत्याचार करणाऱ्यांना लोकांसमोर फाशी द्या
बदलापूर येथे शाळकरी मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. याचदरम्यान बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. पोलीस त्याला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एका पोलीस कर्चचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. तसेच यामध्ये अक्षय शिंदेंचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
याचदरम्यान बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान बदलापूर येथील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. अक्षय शिंदेचे आतापर्यंत तीनवेळा लग्न झाले आहे. बदलापूर पूर्वेकडील खरवई गावात राहणारा आरोपी अक्षय शिंदे हा अवघा २४ वर्षांचा असून, त्याने यापूर्वी तीन लग्न केले होते. त्याच्या या कृत्यामुळे तिन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत. 10वी पास अक्षय शिंदे हा यापूर्वी एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याला कंत्राटावर गार्डची नोकरी मिळाली. अक्षय हा कर्नाटकातील गुलबर्गा गावचा असून त्याचा जन्म बदलापूरच्या खरवई गावात झाला. तो खरवई गावातील चाळीत आई-वडील, भाऊ आणि भावाच्या पत्नीसह राहतो. शाळेत मुलींचा शारीरिक छळ झाल्याची घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली. त्याच्या नातेवाईकाच्या घरावरही गावकऱ्यांनी हल्ला केला. तेव्हापासून अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून बेपत्ता आहे. गावातील महिलांनी सांगितले की, अक्षयने तीन लग्न केले आहेत, मात्र सध्या त्याच्यासोबत कोणतीही पत्नी राहत नाही.
तसेच बदलापूर घटनेबाबत महाराष्ट्रात खळबळ उडाली असताना आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत असतानाच अक्षय शिंदेच्या वडिलांनी खळबळजनक दावा केला आहे. याप्रकरणी आपल्या मुलाची फसवणूक होत असल्याचा दावा अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला आहे. असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. काहीतरी नाही. अक्षयची वैद्यकीय चाचणी पुन्हा करावी, अशी मागणीही अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी केली आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत मुलींच्या लैंगिक छळाची घटना घडली. त्या शाळेत मराठी व इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. बदलापूरच्या या शाळेत 1 ऑगस्ट रोजी अक्षय शिंदेला नोकरीवर ठेवण्यात आले होते. तो शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. लहान मुलींना बाथरूममध्ये नेण्याची जबाबदारी अक्षय शिंदेवर दिल्याचा आरोप आहे. ही घटना 14 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. तीन आणि चार वर्षांच्या दोन मुलींसोबत त्याने घाणेरडे कृत्य केल्याचा आरोप आहे. मुलींनी पालकांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला.