Baramati News: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; बारामती एमआयडीसीतील विमानतळवर नेमक काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, बारामती एमआयडीसी परिसरातील विमानतळाजवळ ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर सूर्यवंशी यांना उपचारासाठी बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत तसेच हल्ल्याचे नेमके स्वरूप आणि कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
Thane Coastal Road: घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी कमी होणार? फ्लेमिंगो आणि खारफुटीच्या संरक्षणासाठी क
राणा सूर्यवंशी हे राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक असून, त्यांनी उद्योग क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मूळचे बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरातील असलेले सूर्यवंशी विविध कंपन्यांमध्ये भागीदार म्हणूनही कार्यरत असल्याची माहिती आहे. उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे ते परिचित आहेत.
दरम्यान, या कथित हल्ल्यामागील नेमके कारण काय, हल्लेखोरांची ओळख पटली आहे का आणि हा पूर्वनियोजित हल्ला होता का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उशिरापर्यंत पोलीस चौकशी सुरू असल्याचे समजते. पोलिसांच्या अधिकृत माहितीनंतरच घटनेचे नेमके स्वरूप, हल्ल्याचे कारण आणि संबंधित व्यक्तींबाबतची माहिती स्पष्ट होणार आहे.
गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई
राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” राणा सूर्यवंशी यांना सुरक्षा पुरवण्यात आली असतानाही काही कारणांमुळे त्या वेळी त्यांच्यासोबतच सुरक्षारक्षक सोबत नव्हते. सुरक्षा रक्षकांचे पथक नसताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल.






