सौजन्य फोटो - सोशल मिडीया
ही घटना श्रीरंगपट्टण येथील ‘आरती उक्कडा’ मंदिरात ‘भीम अमावस्या’च्या दिवशी घडल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने पोलिसांकडून गर्दीचे नियोजन केले जात होते. याच वेळी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यावरून ऐश्वर्या गौडा आणि पीएसआय सविता पाटील यांच्यात वाद झाला.
पुणे रेल्वे स्थानकात बुकिंग क्लार्कवर चाकूने सपासप वार; तब्बल 150 सीसीटीव्ही तपासणीनंतर टोळीला पकडले
गर्भगृहात प्रवेशावरून वाद
सविता पाटील यांना मंदिर परिसरात गर्दी नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, ऐश्वर्या गौडा काही जणांसोबत मंदिरात आल्या आणि रांगेत न थांबता गर्भगृहात जाण्याचा प्रयत्न केला. भाविकांची गर्दी लक्षात घेता सविता यांनी त्यांना काही वेळ थांबण्यास सांगितले. यावरून दोघींमध्ये वाद झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ऐश्वर्या यांनी आपण आमदाराची मुलगी असल्याचे सांगत आपल्याला का अडवण्यात येत आहे, असा सवाल केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वाद वाढला. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही महिला मंदिराच्या गर्भगृहाजवळ एकमेकींसोबत झटापट करताना दिसत आहेत. याच दरम्यान महिला पीएसआय ला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीएसआय कडून तक्रार, आमदारकन्येचीही प्रति-तक्रार
या घटनेनंतर पीएसआय सविता पाटील यांनी क्यातनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ऐश्वर्या गौडा यांच्याविरुद्ध सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करणे, दुखापत करणे, अपमान करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे यांसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, ऐश्वर्या गौडा यांनीही प्रति-तक्रार दाखल केली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याने आपला अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंचे आरोप-प्रत्यारोप समोर आले आहेत.
Exclusive: CCTV footage of BJP MLA Suresh Gowda’s daughter Aishwarya slapping a woman PSI The altercation happened at Arathi Ukkada temple in Srirangapatna on Bheema Amavasya. The incident reportedly involved PSI Savitha B. Patil and the daughter of Tumakuru BJP MLA Suresh… pic.twitter.com/Krj4M8nuIX — Imran Khan (@KeypadGuerilla) August 24, 2026
आमदार सुरेश गौडांनी मागितली माफी
या घटनेनंतर भाजप आमदार सुरेश गौडा यांनी आपल्या मुलीकडून काही चूक झाली असल्यास तिच्या वर्तनाबद्दल माफी मागितली आहे. तसेच मंदिरात व्हीव्हीआयपी संस्कृतीला प्रोत्साहन मिळू नये, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या घटनेची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.






