
Buldhana Crime News
Buldhana Crime News: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे यांच्यावर पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राथमिक माहितीनुसार अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना घडल्याचे समजते. सध्या चिखली पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आर्मी हेडक्वॉर्टरमधून कर्नलच्या केबिनची चोरी! पिस्तुल, काडतूसे आणि रोकड लंपास; गोव्यातून तिघांना अटक
सततचा कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवरा-बायकोतील वाद विकोपाला गेला. या वादातून चिखली शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल काकडे यांनी आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने पत्नी नमिता काकडे यांनी समयसूचकता दाखवत पेटलेली साडी पाण्याने भिजवून जीव वाचवला.
या प्रकरणी नमिता काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली शहर पोलिसांनी विशाल काकडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर चिखली शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट