Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjay Munde on Suresh Dhas: ‘माझ्या आईवर खोटे आरोप…’; सुरेश धसांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा पलटवार

सुरेश धस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नवे आरोप करत, कृषी खात्यातील २०० कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 09, 2025 | 04:15 PM
Dhananjay Munde on Suresh Dhas: ‘माझ्या आईवर खोटे आरोप…’; सुरेश धसांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा पलटवार
Follow Us
Close
Follow Us:

बीड: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली. धस यांनी या हत्येच्या मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचे थेट संबंध माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असल्याचा दावा केला होता. या प्रकरणावर सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतरही सुरेश धस  आपले पत्ते उघडताना दिसत आहे.

भाजपा आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या आईने परळी सोडून नाथ्रा गावी राहण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला.  पण यावर धनंजय मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त करत, “माझ्या जन्मदात्या आईवर खोटे आरोप करणाऱ्यांना मी सहन करणार नाही. अशा निराधार दाव्यांवर गप्प बसणे शक्य नाही,” असा स्पष्ट इशारा दिला. तसेच, “राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेले आहे, याचे वाईट वाटते,” असेही त्यांनी नमूद केले.

Suresh Dhas : “वाल्मिक कराड घरगडी होता अन् त्याचा मालक…”; सुरेश धस यांचा पुन्हा खबळजनक दावा

 ईडीकडे तक्रार करण्याचा सुरेश धस यांचा इशारा, धनंजय मुंडेंचा तीव्र संताप

 सुरेश धस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नवे आरोप करत, कृषी खात्यातील २०० कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, “धनंजय मुंडे यांच्या वागणुकीला कंटाळून त्यांची आई परळी सोडून नाथ्रा गावी राहायला गेल्या” असा दावा त्यांनी एका मुलाखतीत केला.

धनंजय मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वस्तुस्थिती स्पष्ट केली. “परळी वैजनाथ येथील माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे मागील काही महिन्यांपासून मी आणि माझे कुटुंब नाथ्रा येथील शेतातील घरी राहत आहोत. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे,” असे त्यांनी सांगितले.

Raigad News: “केलकम कंपनीच्या कामगारांचे देणे द्या अन्यथा….” ; शिवसेना ठाकरे गटाचा साधना कंपनीला इशारा

मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर दुटप्पीपणा आणि खोटे आरोप करण्याचा आरोप करत, “ज्यांनी आरोप केले, त्याच लोकांनी यापूर्वी मी शेतातील घरात राहतो, असे सांगितले होते. मात्र, आता केवळ माझी आई तिथे राहते असे भासवले जात आहे, हे हास्यास्पद आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आईवर आरोप करणाऱ्यांना इशारा

धनंजय मुंडे यांनी या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया देत “माझ्या आईबद्दल खोटे आरोप करणाऱ्यांना मी सोडणार नाही” असा इशारा दिला आहे. तसेच, “राजकारणाच्या पातळीवर चर्चा करण्याऐवजी कुटुंबीयांना गोवले जात आहे, हे अत्यंत खेदजनक आहे” असेही त्यांनी म्हटले आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असून, ईडीच्या तक्रारीनंतर मुंडेंना चौकशीला सामोरे जावे लागते का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Dhananjay mundes counterattack on suresh dhass allegations nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • dhananjay munde news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.