finally after 7 years he reached the examination center directly from the jail nrvb
कल्याण : सात वर्षापासून (7 Years) जेलमध्ये बंद (Jail) एका तरुणाला जेलमधून बाहेर पडताच माहित पडले की आज त्याची सीईटीची परिक्षा (CET Exam) आहे. एक तासात तो परिक्षा केंद्रावर पोहचला आणि त्याने परिक्षा दिली. आत्तार्पयत जे काही झाले ते झाले. मात्र भविष्यात चांगले जीवन जगायचे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याने परिक्षा दिली आहे. किशोर रुमाले (Kishor Rumale) असे या तरुणाचे नाव आहे. मुरबाड (Murbad) येथील मिले गावात (Mile Village) तो राहतो.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 22 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-22-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
मुरबाडमधील मिले गावात राहणारा तरुण किशोर हा 27 जुलै 2016 रोजी त्याच्या मित्रकडे आला होता. मित्रच्या घरी पोहचताच. क्राईम ब्रँचची (Crime Branch) टीम दाखल झाली. बघता बघता किशोर याला विठठलवाडी, अंबरनाथ पोलिसांनी चोरीच्या आरोपात अटक केली. तलासरीतील गुन्हयात त्याला मोक्का (Mokka) लावण्यात आला. सात वर्षापासून तो जेलमध्ये होता.
[read_also content=”लोकं उकाड्याने हैराण आहेत, घामाच्या धारा लागल्यात, उन्हाच्या झळांनी जीव मेटाकुटीला आलाय आणि पश्चिम बंगालमध्ये घडलीये विचित्र घटना; VIDEO झालाय VIRAL https://www.navarashtra.com/viral/a-strange-video-of-west-bengal-tmc-mla-vimalendu-singh-roy-distributing-blankets-to-the-poor-is-going-viral-nrvb-387837/”]
त्याचे वकिल पत्र गणेश घोलप यांनी घेतले. त्याच्या जामीनाची प्रक्रिया घोलप यांनी सुरु केली. घोलप यांना पाहून किशोरच्या मनात वकील होण्याची इच्छा निर्माण झाली. त्याने जेलमध्येच अभ्यास सुरु केला. त्याला वकिलीची परिक्षा द्यायची होती. मात्र कोरोनामुळे परिक्षा देता आली नाही. सात वर्षानंतर त्याचा जामीन मंजूर झाला. २० एप्रिल रोजी तो तळोजा जेलमधून बाहेर पडला. त्याला माहिती पडले की, नवी मुंबईतील खारघर येथील भारती विद्यापीठाच्या परिक्षा केंद्रावर पेपर आहे. दीड तासात परिक्षा केंद्रावर पोहोचला. त्याने पेपर दिला. त्याला वकील होऊन भविष्यात चांगले जीवन जगायचे आहे.