
सोशल मीडियावर (Social Media) एक महिला आणि तिच्या भावाचा एडीट केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका 19 वर्षीय मुलीला अटक केली आहे. पोलीस चौकशीत जे सत्त समोर आलं त्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या मुलीने हे सगळ फक्त एका मुलाचा बदला घेण्याच्या उद्देशाने केल्याचं समोर आलं आहे. या मुलाने तिची प्रतिमा खराब केल्याचा तिने आरोप केला आहे. सानिया (वय,19) असं आरोपी मुलींच नाव असुन ती दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगमध्ये बीएच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.
[read_also content=”पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना भारत मदत करणार नाही; असं का म्हणाले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर? जाणून घ्या! https://www.navarashtra.com/world/what-jaishankar-said-about-india-help-pakistan-in-economic-crisis-n-rps-371461.html”]
डीसीपी सागर सिंह कलसी यांनी सांगितले की, इंद्रलोक येथे राहणाऱ्या एका मुलीने त्यांच्याकडे यापूर्वी तक्रार केली होती. कोणीतरी तिच्या भावासह तिचे अश्लील फोटो बनवून इंस्टाग्रामवर टाकले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक यंत्रणेच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली. त्यांनतर चौकशी दरम्यान एका मुलीने हे कृत्य केल्याची बाब समोर आली. या मुलीने तरुणाला त्रास देण्यासाठी हे सगळं केलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. तिने त्याची बदनामी करण्यासाठी त्याचे आणि त्याच्या बहिणीने काही फोटो एडीट करुन सोशल मिडियावर टाकले. तसेच त्याच्या नातेवाइकांना अश्लील मेसेजही पाठवले.
उत्तर पश्चिम दिल्लीतील इंद्रलोक भागात राहणाऱ्या आरोपी तरुणीने पोलिसांना सांगितले की, तिच्या शेजाऱ्याची एका मुलाशी चांगली मैत्री होती. पण त्याने त्याचा फायदा घेत तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापले या तरुणीने बदला घेण्यासाठी इंस्टाग्रामवर फेक आयडी तयार करून त्याच्या बहिणीसोबतचे छायाचित्रे एडीट करुन पोस्ट केले. केवळ बदला घेण्यासाठी तिने त्याचे त्याच्या बहिणीचे अश्लील फोटो पोस्ट करत त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला.