horrible news hong kong famous model ab choi murder fridge corpse pieces severed head gruesome revelations accused arrested police crime nrvb
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या (Shraddha Walkar Murder Case) आठवणींना उजाळा देणाऱ्या चीनमधील विशेष प्रशासकीय शहर हाँगकाँगमध्ये (Hong Kong) हत्येचे असेच एक भयानक प्रकरण (Murder Case) समोर आले आहे. तेथे प्रसिद्ध मॉडेल एबी चोईची (Abby Choi) निर्घृण हत्या करण्यात आली (Murder) आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये (Dead Body Cut Pieces And Put Into Fridge) ठेवण्यात आले. आता एबीचे शीर पोलिसांनी एका मोठ्या सूप पॉटमधून जप्त केले आहे (Police Get Head From Soup Pot). ज्यामध्ये सूप आणि भाज्या यांच्यामध्ये डोके ठेवले होते.
२८ वर्षीय मॉडेल एबी चोई हाँगकाँगची प्रसिद्ध मॉडेल होती. २१ फेब्रुवारी रोजी ती अचानक कुठेतरी बेपत्ता झाली. यावेळी त्यांचा शोध घेण्यात आला आणि पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. प्रकरण हाय प्रोफाईल होते. याकडेही माध्यमांचे लक्ष लागले होते. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत होते. तेव्हाच पोलिसांना ताई पो जिल्ह्यातील एका घराची माहिती मिळाली. जिथं एबी चोई शेवटची दिसली होती.
त्यामुळे माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या घरात जाऊन छापा टाकला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता एबी चोई कुठेच आढळून आली नाही, मात्र घरात ठेवलेला फ्रीज उघडला असता फ्रीजमध्ये दोन मानवी पाय आणि मांस पाहून पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी कापलेले पाय, मानवी मांस, इलेक्ट्रिक करवत, मांस कापण्याचे यंत्र आणि महिलेचे कपडे जप्त केले आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एबीचे शीर पोलिसांना सापडले नाही.
त्यानंतरच पोलिसांनी त्या घराच्या रेफ्रिजरेटरमधून सापडलेले मानवी शरीराचे तुकडे आणि दोन्ही पाय तपासणीसाठी पाठवले जेणेकरून ते तुकडे एबी चोईच्याच मृतदेहाचे आहेत याची त्यांना खात्री करता येईल. आता पोलीस चोईच्या उरलेल्या मृतदेहाचा शोध घेत होते. दरम्यान, मंगळवारी तपासादरम्यान पोलिसांना याच घरात लपवून ठेवलेली मोठी भांडी सापडली. हे असे भांडे होते, जे सूप बनवण्यासाठी आणि ठेवण्यासाठी वापरले जाते.
पोलिसांनी मडक्याचे झाकण उघडले असता त्यात सूपसारखे द्रव भरले होते. ज्यात गाजर, कोबी अशा चिरलेल्या भाज्या वर तरंगत होत्या. त्यावरही काही तवंग जमा झाला होता. ते द्रव बाहेर काढून वेगळे करताच त्यात मानवी शीर सापडले. ज्यावर मांस आणि कातडे नव्हते. हे दृश्य पाहून पोलिसांना हे डोके एबी चोईचे आहे हे समजायला वेळ लागला नाही. मात्र याची खातरजमा करण्यासाठी ते डोके तपासासाठी पाठवण्यात आले.
दुसरीकडे, या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस अधीक्षक ॲलन चुंग यांनी पत्रकारांना सांगितले की, एबी चोईचे डोके ज्या अवस्थेत सापडले ते आश्चर्यकारक आहे. ज्या भांड्यात डोकं सापडलं ते पाण्याने भरलेलं होतं आणि त्यावर भाज्यांचे तुकडे तरंगत होते. त्यातून मिळालेल्या डोक्यावर कातडे किंवा मांस नव्हते.
[read_also content=”ट्रकमध्ये अडकल्याने स्कूटी दोन किलोमीटरपर्यंत नेली ओढत, आजोबा आणि नातवाचा मृत्यू – पाहा VIDEO https://www.navarashtra.com/viral/crime-uttar-pradesh-scooty-dragged-for-two-kilometers-after-getting-stuck-in-a-truck-in-mahoba-death-of-grandfather-and-grandson-watch-video-viral-nrvb-372540.html”]
पोलीस अधिकारी एलन चुंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एबी चोईचे माजी पती ॲलेक्स क्वांग, सासरे क्वांग काऊ, माजी सासू जेनी ली आणि मेहुणा अँथनी क्वांग यांच्या नावांचा समावेश आहे. चोईची माजी सासू जेनी ली हिला पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, मॉडेलवर आधी कारने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एबी चोई जखमी होऊन बेशुद्ध झाली. यानंतर आरोपींनी एबी चोईला उचलून त्यांच्या घरी नेले आणि तेथे तिची इलेक्ट्रिक करवतीने वार करून हत्या केली. यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. डोके धडापासून वेगळे करून त्या मोठ्या भांड्यात लपलेले होते त्यामुळे तिची ओळख पटू शकली नाही.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध मॉडेल एबी चोईचा तिचा माजी पती आणि त्याच्या कुटुंबाशी करोडोंच्या मालमत्तेवरून वाद झाला होता. एबी चोईला ही मालमत्ता विकायची होती. तर तिचा माजी पती आणि कुटुंबीय यामुळे संतापले होते. यावरून गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात अनेकदा भांडण झाले होते.
एबी चोईचे माजी सासरे क्वांग काऊ हे या घटनेचे सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. ते पोलिस अधिकारी राहिले आहेत. जे २००५ साली पोलीस दलातून निवृत्त झाले. यापूर्वी २००१ मध्ये त्यांना प्रदीर्घ पोलीस सेवेसाठी पदकही मिळाले होते. एका महिलेचा लैंगिक छळ केल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचा आरोप चीनी वृत्तपत्र सिन चिऊ डेलीने केला आहे.