Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi News: लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगात रचला होता ‘त्या’च्या हत्येचा कट; पोलिसांच्या आरोपपत्रात मोठा खुलासा

नादिर शाहच्या हत्येनंतर हाशिम बाबाने मोबाईल फोन तोडून तो तुरुंगातील टॉयलेटमध्ये टाकल्याचेही पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला नोटीस बजावली होती

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 17, 2024 | 03:43 PM
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मंत्र्याला धमकी; क्यूआर कोड पाठवून मागितली खंडणी

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मंत्र्याला धमकी; क्यूआर कोड पाठवून मागितली खंडणी

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्लीतील जिम मालक नादिर शाह यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने साबरमती तुरुंगात बसून नादिर शाहच्या हत्येचा कट  रचला होती.  दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.  12 डिसेंबर रोजी पटियाला हाऊस कोर्टात लॉरेन्स बिश्नोईचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. लॉरेन्स बिश्नोई, हाशिम बाबा, रणदीप मलिक यांच्यासह 14 आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लॉरेन्सने साबरमती तुरुंगातून व्हिडिओ कॉलकरून  तिहार तुरुंगात असलेल्या  गँगस्टर हाशिम बाबाशी चर्चाही केली होती.  दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान हाशिम बाबाने हा खुलासा केला आहे.

लॉरेन्स साबरमती कारागृहात वापरतोय मोबाईल

लॉरेन्सने साबरमती तुरुंगातून व्हिडिओ कॉल करून तिहार तुरुंगात असलेल्या गँगस्टर हाशिम बाबाशी बोलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान हाशिम बाबाने हा खुलासा केला आहे.  लॉरेन्सने त्याला व्हिडिओ कॉल करून दोन फोनही दाखवले होते. याचवेळी त्यांने नादिरच्या हत्येसाठी  नेमबाजांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले होते.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ विरोधात उद्धव ठाकरेंचा एल्गार; “हे जनतेच्या डोक्यावर लादू नये

लॉरेन्स बिश्नोईची  चौकशी

या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या पथकाने साबरमती तुरुंगात जाऊन लॉरेन्सची चौकशीही केली होती. आरोपपत्रात हत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसून, वेगवेगळ्या टोळ्यांमधील परस्पर वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात आले. तसेच. अमेरिकेत बसून लॉरेन्सचा खास गुंड रणदीप मलिक याने त्याच्या हत्येसाठी शस्त्रे पाठवली होती.

 नादिरची जिमबाहेर हत्या

दिल्लीतील पॉश क्षेत्र असलेल्या ग्रेटर कैलाश भागात ३५ वर्षीय जिम मालक नादिर शाह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. जेव्हा तो त्याच्या ‘शार्क जिम’च्या बाहेर कोणाशी तरी बोलत होता. नादिरशहाला तीन ते चार गोळ्या लागल्या. गोळीबार केल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी नंतर अटक केली. नादिर शाह हत्याकांडात कुख्यात गुंड हाशिम बाबा यानेही दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले होते.

Uddhav Thackeray Nagpur PC : काँग्रेसने सावरकरांबद्दल आणि मोदींनी नेहरुंबद्दल बोलणं

 

नादिर शाह खून प्रकरणात अनेक खुलासे

नादिर शाह हत्या प्रकरणात कुख्यात गुंड हाशिम बाबा याने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले होते. तिहार तुरुंगात बंद असलेला हाशिम बाबा साबरमती कारागृहात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईशी फोनवर बोलत असे. हाशिम बाबाने साबरमती तुरुंगात बंदिस्त असलेल्या लोरेश बिश्नोईशी तिहार तुरुंगातून दोन महिन्यांत अनेकदा बोलले होते. हाशिम बाबा नादिर हत्याकांड करणाऱ्या नेमबाजांशी तिहार तुरुंगातून सतत फोनवर बोलत होता. इतकंच नाही तर तो आपल्या कुटुंबाच्या सतत संपर्कात असल्याचेही त्याने सांगितले.

मोबाईल शौचालयात फ्लश केला

नादिर शाहच्या हत्येनंतर हाशिम बाबाने मोबाईल फोन तोडून तो तुरुंगातील टॉयलेटमध्ये टाकल्याचेही पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला नोटीस बजावली होती. दुबईत बसलेल्या अनुप जुनेजा यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी कुणाल छाबरा यांना चौकशीसाठी नोटीसही बजावण्यात आली होती.

Web Title: Lawrence bishnoi plotted to assassinate nadir shah in prison nra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 03:43 PM

Topics:  

  • Lawrence Bishnoi
  • sidhu moosewala Murder

संबंधित बातम्या

कॉमेडियन कपिल शर्माची वाढवली सुरक्षा, बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय
1

कॉमेडियन कपिल शर्माची वाढवली सुरक्षा, बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध होणार मोठी कारवाई; ‘या’ कारणामुळे अल्बर्टाचे सरकार आक्रमक पवित्र्यात
2

कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध होणार मोठी कारवाई; ‘या’ कारणामुळे अल्बर्टाचे सरकार आक्रमक पवित्र्यात

Lawrence Bishnoi : तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत कशी घेतली गेली? सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न
3

Lawrence Bishnoi : तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत कशी घेतली गेली? सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न

लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रारपासून वेगळे झाले, आता दुसरा मित्र सापडला! लॉरेन्स बिश्नोईची नवीन जोडीदार नोनी राणा कोण आहे?
4

लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रारपासून वेगळे झाले, आता दुसरा मित्र सापडला! लॉरेन्स बिश्नोईची नवीन जोडीदार नोनी राणा कोण आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.