Beed Crime: धक्कादायक! शाळेबाहेर विद्यार्थ्याला टोळक्याची बेदम मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
नेमकं काय घडलं?
वाकोला येथे राहणारी पाच वर्षांची चिमुकली ही घराजवळून बेपत्ता झाल्याची तक्रार २२ नोव्हेंबर दाखल करण्यात आली होती. वाकोला पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी सात पथके तयार केले. त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. तपास पथकांनी सलग दोन दिवस रात्र एक करून तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे तपस केला. यादरम्यान त्यांना एक संशयित रिक्षाचे वर्णन मिळाले.
हि रिक्षा सांताक्रुज येथून पनवेल येथे गेली आणि परत आली. रिक्षाचा क्रमांक न मिळाल्याने केवळ वर्णनावरून सांताक्रूझ पूर्वेकडून चालक लतीफ अब्दुल माजिद शेख याला आणि रिक्षाला ताब्यात घेतले. लतीफ याने चिमुकलीचा मामा लॉरेन्स निकलेस फर्नांडिस आणि मामी मंगल यांनीच अपहरण केल्याची माहिती दिली. पनवेल येथून चिमुकलीच्या मामला आणि मामीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी ओळखीचा तरुण करण मारुती सणस याला ९० हजार रुपयांना चिमुकलीची विक्री केली असे कबुल केले.
दुप्पट रकमेवर पुन्हा विक्री
पोलिसांनी करणला पनवेलच्या उसर्ली बुद्रुक येथून शोधून काढले आणि ताब्यात घेतले. त्याने आणखी दोन महिलांची नावे सांगितली. त्याने चिमुकलीला एक लाख ९० हजारांना वृंदा विनेश चव्हाण आणि अंजली अजित कोरगावकर या दोघींना विकल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत वृंदाला शोधून काढले व तिच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली. पोलिसांनी तिची सुखरूप सुटका करत तिला सांताक्रूझ येथील घरी आणून पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी लॉरेन्स, मंगल, लतीफ, करण आणि वृंदा यांना अटक केली असून अंजलीचा शोध सुरू आहे.
Mumbai Crime: मुंबईत वाढदिवसाचा थरार! केक कापला, आधी अंडी, दगड आणि त्यानंतर पेट्रोल टाकून…
Ans: तिचे मामा लॉरेन्स फर्नांडिस आणि मामी मंगल यांनीच अपहरण करून विक्री केली.
Ans: पोलिसांनी सीसीटीव्ही, संशयित रिक्षाचे वर्णन आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे 48 तासांत मुलीला शोधून सुरक्षित परत आणले.
Ans: एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे; एक महिला आरोपी अंजली फरार असून शोध सुरू आहे.






