कमला पसंद आणि राजश्री पान मसाला मालकाच्या सुने दीप्ती चौरासिया (40) हिने आत्महत्या केली. सुसाईड नोट सापडली पण नाव नाही. कुटुंबीयांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. पोलिस तपास सुरू आहे.
मुंबईत धक्कादायक घटना! मामा-मामीने 5 वर्षांच्या चिमुकलीला 90 हजारांना विकलं आणि पुढे तिला 1.80 लाखांना पुन्हा विकण्यात आलं. पोलिसांनी तांत्रिक तपास करून 48 तासांत मुलीची सुटका केली आणि पाच आरोपींना…
मुंबईच्या कुर्ल्यात वाढदिवस साजरा करताना मित्रांनीच 21 वर्षीय तरुणावर पेट्रोल टाकून आग लावली. तरुण गंभीर भाजला असून 5 आरोपी अटकेत आहेत. घटना सीसीटीव्हीत कैद. नागपुरात प्रेमविवादातून तरुणाची हत्या.
डोंबिवलीतील पलावा उड्डाणपुलाखाली सूटकेसमध्ये एका तरुणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तिच्यावर अत्याचार व मारहाण करून हत्या झाल्याचा संशय. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, ओळख पटवण्यासाठी तपास सुरू.मुंबईतील डोंबिवली पर
अनंत गर्जे वरळीतील बीडीडी चाळीत भाड्याने राहतो. या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून महत्त्वाचे धागेदोरे आणि परिस्थितीजन्य पुरावे मिळवण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने गर्जेच्या घराची झडती घेतली. गौरीने नेमक्या कोणत्या परिस्थितीत
गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांना मध्यरात्री वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर अटक करण्यात आली. गर्जे, त्यांची बहीण आणि दीरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे.
गौरी गर्जे यांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना अनंत गर्जे म्हणाले की, ज्यावेळी हा प्रकार झाला त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते.
मुंबईवरच्या २६/११ हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण होत असताना सागरी सुरक्षेत मोठी ढिलाई उघड झाली आहे. ६९ पैकी २३ बोटी नादुरुस्त, कर्मचाऱ्यांची कमतरता, सीसीटीव्ही नसणे आणि अनधिकृत बोटींची वाढ, यामुळे किनारपट्टी…
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने मध्यरात्री तिची दगडाने ठेचून हत्या केली. अपराध केल्यानंतर सकाळी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
कांदिवली चारकोपमध्ये पेट्रोल पंपासमोर अज्ञातांनी विकासक फ्रेंडी दिलीमाभाईवर 2–3 राऊंड गोळीबार करून त्याला गंभीर जखमी केले. आरोपी फरार असून पोलिस व फॉरेन्सिक टीम तपासात सक्रिय.
गोरेगाव पश्चिम स्टेशनबाहेर दोन अनधिकृत भाजीवाल्यांच्या टोळ्यांत झालेल्या हाणामारीत एका विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. जुन्या रागातून झालेल्या या हल्ल्याप्रकरणी आई, वडील व मुलगा अटकेत.
मालाडमध्ये ट्रान्सजेंडर गँगने 19 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला धमकावले, ब्लॅकमेल केले आणि सूरतमध्ये जबरदस्ती जेंडर बदल शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक आरोप आहे.पीडिताने पळून सुटका केली असून पोलिसांनी चार आरोपींना अटक
भायखळ्यातील हबीब मेन्शन येथे पायाभरणीच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. तिघांची प्रकृती स्थिर आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अपहृत झालेली चार वर्षांची चिमुकली तब्बल सहा महिन्यांनंतर वाराणसीतील अनाथाश्रमात सापडली. “ऑपरेशन शोध” अंतर्गत पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनंतर तिचा शोध लावला आणि सोपवण्यात आले.
मुंबईतील मरोळ नाका परिसरात बांधकाम चालू असलेल्या इमारतीवरून लोखंडी रॉड पडून नाशिकचा 30 वर्षीय अमर पगारे यांचा मृत्यू झाला. सततच्या अशा दुर्घटनांमुळे मुंबईतील बांधकाम सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत १३ किलोहून अधिक हायड्रोपोनिक वीड आणि ८७ लाखांचं परकीय चलन जप्त केलं. ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान पाच वेगवेगळ्या प्रकरणांत प्रवाशांना अटक.
भिवंडी तालुक्यात 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. चोरीचा हेतू नसून ओळख लपवण्यासाठी हत्या झाल्याची शक्यता; परिसरात भीतीचं वातावरण.