Mumbai Crime: मुंबईत वाढदिवसाचा थरार! केक कापला, आधी अंडी, दगड आणि त्यानंतर पेट्रोल टाकून…
गुन्हा दाखल नाही
याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ आहे. पीडित विद्यार्थीला कोणत्या कारणातून मारहाण करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही आहे.
बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरूच; शालेय विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांच्याच टोळक्याकडून बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल#Beednews #Crimenews #Videoviral pic.twitter.com/pWk46aGKgb — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 26, 2025
बिड जिल्ह्यातून सतत मारहाण, हत्या, गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. आता शाळेच्या बाहेरच विध्यार्थीवर मारहाण झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केला नाही आहे. आता पोलीस काय कारवाई करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नात्यातील मुलाकडून साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; गावकऱ्यांनी गुन्हा दडपण्याचा केला प्रयत्न
बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. साडेपाच वर्षीय चिमुरडीवर नात्यातीलच एका मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी बदनामीच्या भीतीने पीडितेच्या आईवर गुन्हा दडपण्याचा दबाव आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
एकतर्फी प्रेमातून तरुणाची हत्या; चाकूने भोसकून रक्ताच्या थारोळ्यात लोळवलं अन्….
११ नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची घटना घडली. परंतु, घटनेनंतर तब्बल चार दिवस गावातील लोकांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात जाऊ दिले नाही. बदनामी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी चक्क बैठका घेऊन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत चिमुरडी अतोनात वेदना सहन करत होती. तिच्या नात्यातील काही व्यक्तींना ही गंभीर बाब समजल्यानंतर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शिरूर कासार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.
चार दिवसांच्या विलंबानंतर अखेर मुलीच्या आईने सर्व दबाव झुगारून उपचारासाठी बीड येथील सरकारी रुग्णालयात धाव घेतली. पीडित चिमुरडीवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.
Ans: शिरूर तालुक्यातील रायमोह येथील अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर.
Ans: मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Ans: आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही; कारवाईची प्रतीक्षा आहे.






