मुंबई: अंडरवर्ल्डचा किंगपिन छोटा राजन याच्या गुंडाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विलास पवार नावाच्या या गुन्हेगारावर खून, खंडणी, जमीन बळकावणे, अवैध शस्त्र बाळगणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या 32 वर्षांपासून फरार असलेला राजू चिकन्या उर्फ विलास बलराम पवार याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. तो छोटा राजनचा खास गुंड म्हणून ओळखला जात होता. त्याला राजू विकन्या उर्फ विलास बलराम पवार या नावाने हाक मारली जाते.
हा आरोपी मुंबईतील चेंबूर परिसरात लपल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने चेंबूर परिसरात जाऊन या आरोपीला अटक केली. या आरोपीविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात खून, खंडणी अपहरण, बेकायदेशीर शस्त्रास्त्रे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आज छोटा राजनच्या या निकटवर्तीयाला मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार होते.
“…ते तुझ्या संघर्षाचे फळ आहे”, अभिनेता किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंसाठी खास
राजू चिकन्या उर्फ विलास पवार यांची दहशत इतकी आहे की, त्याचे नाव ऐकूनही लोक घाबरतात. इतके दिवस पोलीस त्याचा शोध घेत होते. तब्बल3 दशकांनंतर त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. छोटा राजनचा खास माणून म्हणून ओळखला जाणारा विलास पवार गुन्हे करून पोलिसांच्या हातावरी तुरी देऊन पळून जाण्यात अनकेदा त्याला यश आले होते.
राम पवारने कित्येक खून केले, लोकांना घाबरवून लुटमार केली. हे गुन्हे करत असतानाच तो तब्बल 32 वर्षे पोलिसांपासून सुरक्षित राहिला. तो मुंबईत लपल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठले. अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विलास पवार याला पोलिसांनी पकडले. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
Pune Accident : भरधाव कारची दुचाकीला धडक; दीर- भावजयचा मृत्यू
दरम्यान, ऑक्टोबर 2024 मध्येच मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने छोटा राजनच्या टोळीशी संबंधित असलेल्या काही गुंडांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये छोटा राजन टोळीचा सदस्य गणेश राम शोराडी उर्फ डॅनी उर्फ दादा, रेमी फर्नांडिस, प्रदीप यादव, मनीष भारद्वाज आणि शशी यादव यांचा समावेश आहे. यातील एका आरोपीचा गुन्हे पत्रकार जे डे यांच्या हत्येतही सहभाग होता.पाच आरोपींना मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक केली आहे. त्याच्यावर बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
मुंबईला लागून असलेल्या पालघरमधील नायगाव येथील एका महिलेने तिची मालमत्ता एका बिल्डरला विकली आणि त्यानंतर ही बाब या लोकांना समजल्यानंतर त्यांनी पैसे उकळण्यासाठी बिल्डरशी संपर्क साधला. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी बिल्डरला वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले आणि ज्या महिलेकडून बिल्डरने मालमत्ता खरेदी केली होती तिचे गणेशसोबत पूर्वीचे व्यवहार असल्याचे त्याला सांगण्यात आले.
बिल्डर आणि त्याचे साथीदार मालमत्तेची पाहणी करत असताना टोळीशी संबंधित लोकांनी बिल्डरला धमकावत १० कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे सांगितले. पोलिसांनी सांगितले की, बिल्डर जेव्हा आरोपींना भेटला तेव्हा त्यांनी त्याला पिस्तुल दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला. सततच्या धमक्यांना घाबरून बिल्डरने वेगवेगळ्या टोळ्यांतील आरोपींना सात लाख रुपये दिले, मात्र त्याच्याकडून आणखी पैशांची मागणी केली जात होती.