Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baba Siddique case: बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठी अपडेट: मुंबई पोलिसांकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल 

12 ऑक्टोबर 2024 रोजी माजी राज्य मंत्री जियाउद्दीन अब्दुल रहीम सिद्दीकी उर्फ बाबा सिद्दीकी यांची निर्मल नगर, वांद्रे येथील पोलिस स्टेशनजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 06, 2025 | 04:06 PM
Baba Siddique case: बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठी अपडेट: मुंबई पोलिसांकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल 
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  मुबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात विशेष मकोका कोर्टात 4590 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात 210 साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, 26 अटकेत आरोपींसह 3 आरोपींना वाँटेड घोषित केले आहे. वाँटेड आरोपींमध्ये जिशान अख्तर, शुभम लोनकर, आणि अनमोल बिश्नोई यांचा समावेश आहे.

हत्येच्या तीन प्रमुख कारणांचा उल्लेख

मुंबई पोलिसांच्या चौकशीनुसार, या हत्येमागील तीन प्रमुख कारणे असू शकतात:

  1. सलमान खानशी असलेली जवळीक.
  2. अनुज थप्पनच्या आत्महत्येचा बदला.
  3. बिश्नोई गँगचे मुंबईतील वर्चस्व वाढवणे आणि दहशत निर्माण करणे.

पोलिसांनी शुभम लोणकरच्या फेसबुक पोस्टचा आधार घेत या कारणांची पुष्टी केली आहे.

Breaking : मुंबईत पुन्हा दहशतीचे षडयंत्र? ताज हॉटेलबाहेर एकाच नंबरच्या दोन गाड्या; नेमकं काय प्रकरण?

शुभम लोणकरची फेसबुक पोस्ट

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला. शुभम लोनकर महाराष्ट्र नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून हा पोस्ट शेअर करण्यात आला होता. पोलिसांनी लोणकरचा तपास सुरू केला, मात्र तो गाव सोडून गेला असल्याचे समजले. अकोट शहर पोलिस स्टेशनने 16 जानेवारी 2024 रोजी शुभम लोनकर, प्रवीण लोणकर आणि अकोट तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आणखी आठ जणांवर आर्म्स ऍक्टखाली गुन्हा दाखल केला होता.

लॉरेन्स बिश्नोई यांचे नाव या आरोपपत्रात थेट नाही.

अनमोल आणि अख्तर यांच्यासह लोणकरलाही खून प्रकरणात वॉण्टेड गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. गुन्ह्याची योजना आखण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा असल्याचा पोलिसांचा विश्वास आहे. मात्र, या आरोपपत्रात थेट लॉरेन्स बिश्नोईचे नाव नाही आणि वॉन्टेड संशयित म्हणून त्याचे नावही दिलेले नाही. त्याचा या प्रकरणाशी अप्रत्यक्ष संबंध असल्याचेही बोलले जात आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण

12 ऑक्टोबर 2024 रोजी माजी राज्य मंत्री जियाउद्दीन अब्दुल रहीम सिद्दीकी उर्फ बाबा सिद्दीकी यांची निर्मल नगर, वांद्रे येथील पोलिस स्टेशनजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर निर्मल नगर पोलिस स्टेशनमध्ये जी.आर.नं. 589/2024 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला होता. आता मुंबई पोलिसांनी आपले तपास पूर्ण करून विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र सादर केले आहे.

सहाव्या पिढीचे रहस्यमय फायटर जेट ‘J-36’ बनेल चिनी ड्रोन आर्मीचा कमांडर

MCOCA म्हणजे काय?

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच MCOCA महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये लागू केला. राज्यातून संघटित गुन्हेगारी रोखणे हा त्याचा उद्देश आहे. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींवरही मकोका लावण्यात आला आहे. हा कायदा दिल्लीतही लागू आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 2002 मध्ये राष्ट्रीय राजधानीत याची अंमलबजावणी केली होती.

सलमान खानला इशारा !

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला संदेश पाठवण्याच्या उद्देशाने हा गुन्हा करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि इतर दोन व्यक्ती शुभम लोणकर आणि झीशान अख्तर यांचा समावेश आहे.

Web Title: Mumbai police files chargesheet in mcoca court in baba siddiqui murder case nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 03:57 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.