चुलत दीर आणि भावजयी बेपत्ता झाले अन् दुसऱ्याच सकाळी शेतातील स्टोअर रूममध्ये...

घरासमोर दुचाकी दिसली अन् नातेवाइकांनी शेतातील स्टोअर रूम उघडली... आतील दृश्य पाहून गाव हादरले! गुरुवारी बेपत्ता झालेल्या चुलत दीर आणि भावजयीने शनिवारी गावात परतताच उचलले टोकाचे पाऊल; वावी पोलिसांकडून प्रेमप्रकरणाच्या अँगलने तपास सुरू.
Nashik Suicide Case
सौजन्य फोटो - AI GeminiNashik Suicide Case
Published on: 
Updated on: 
  • चुलत दीर-भावजयीची गळफास घेऊन आत्महत्या

  • गुरुवारी बेपत्ता होऊन शनिवारी सकाळी घटना उघडकीस

  • पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद, पुढील तपास सुरू

नाशिक: चुलत दीर आणि भावजयीने एकत्रित गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सायाळे गावातून ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आली. सुनील दिनकर थोरात (वय २६) आणि वैष्णवी श्रावण थोरात (वय २५) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून खळबळ उडाली आहे.

Nashik Suicide Case
शिक्षकी पेशाला काळीमा! नऊ वर्षीय चिमुरडीला फूस लावून संचालकाच्या हवाली अन्...

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील हा गुरुवारी (दि. २६) कोणालाही कोणतीही कल्पना न देता अचानक घरातून निघून गेला होता. नेमक्या त्याच दिवशी माहेरी गेलेली वैष्णवीदेखील तेथून बेपत्ता झाल्याची बाब पुढे आली. दोघेही अचानक गायब झाल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर वैष्णवीच्या नातेवाइकांनी गुरुवारी (दि. २६) कोपरगाव येथे, तर सुनीलच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी (दि. २७) वावी पोलीस ठाण्यात ते हरवल्याबाबत तक्रार नोंदवली होती.

सकाळी दुचाकी दिसल्यानंतर घटना उघड

शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सुनीलची दुचाकी घरासमोर उभी असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. रात्री उशिरा गावात आल्यानंतर सुनील शेतातील स्टोअर रूममध्येच झोपला असावा, अशा समजुतीने घरचे मंडळी व नातेवाइक तेथे गेले. मात्र, स्टोअर रूममधील दृश्य पाहताच त्यांना मोठा धक्का बसला आणि दोघांनी गळफास घेतल्याचे उघड झाले.

घटनेची माहिती मिळताच सायाळे येथील पोलीस पाटलांनी तात्काळ वावी पोलीस ठाण्याला कळवले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर, किरण सोनवणे आणि हवालदार सचिन काकड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी दौंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सायाळे येथे शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आल.

Nashik Suicide Case
८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्ट अन् ४५.२० लाखांचा गंडा! ईडी, आरबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाची बनावट पत्रे दाखवून सायबर लुट!

प्रेमप्रकरणाच्या अँगलने पोलिसांचा तपास सुरू

या संपूर्ण प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघेही एकाच वेळी बेपत्ता होणे आणि त्यानंतर रातोरात गावात परतल्यानंतर शेतातील स्टोअर रूममध्ये जीवन संपवणे, या घटनाक्रमामुळे त्यांच्यात प्रेमप्रकरण होते का? अथवा यामागे अन्य कोणती कारणे आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन काकड या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Q

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सायाळे गावात नेमकी काय घटना घडली?

A

सायाळे गावात सुनील दिनकर थोरात (२६) आणि वैष्णवी श्रावण थोरात (२५) या चुलत दीर-भावजयीने शेतातील स्टोअर रूममध्ये एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या केली.

Q

हे दोघे कधीपासून बेपत्ता होते आणि तक्रार कुठे दाखल होती?

A

दोघेही गुरुवार (दि. २६) पासून बेपत्ता होते; वैष्णवी बेपत्ता असल्याची तक्रार कोपरगाव येथे, तर सुनीलची तक्रार वावी पोलीस ठाण्यात नोंदवली गेली होती.

Q

या प्रकरणाचा तपास कोणते पोलीस ठाणे करत आहे?

A

वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन काकड पुढील तपास करत आहेत.