नाशिक जिल्ह्यातील रुई या गावातील रस्त्यांची दूरावस्था पाहता ग्रामस्थांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात.
Nashik Airport Expansion : सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामास कुंभमेळा विकास प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता दिली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात घट होत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा कमी होताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिकच्या मालेगावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली. २४ वर्षीय आरोपी विजय खैरनरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिसरात भीती आणि रोषाचे वातावरण आहे.
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकसाठी सोमवार (दि.१७) हा शेवटचा दिवस असल्याने नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
नाशिक मध्ये स्थित असलेले बिडी भालेकर शाळेला जमीनदोस्त करण्यासाठी नाशिक प्रशासन प्रयत्नशील आहे तर त्या विरोधात स्थानिक नागरिक तसेच माजी विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नाशिकमध्ये भोंदूबाबा गणेश जगताप याने जमिनीतून सोने काढण्याचे, पूजाविधी करण्याचे आणि कुटुंबावर संकट येईल अशा धमक्या देत महिलेला लैंगिक शोषणासह तब्बल 50 लाखांची फसवणूक केली. भोंदूबाबा फरार आहे.
नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सिंहस्थ कुंभमेळ्यात ७५ वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आल्याने हे कुंभपर्व विशेष असून ते २८ महिने चालणार आहे. ४० ते ४२ पर्वस्नान आणि महत्वाचे अमृतस्नान या कुंभात होणार आहे.
Kumbh Mela 2027: जळगाव ते नाशिक विमानसेवा कुंभमेळ्यासाठी सुरू, पण पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दुर्लक्षित. वेरुळ दर्शनासाठी कनेक्टिव्हिटीची मागणी.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासन पातळीवरून निधीची पुर्तता करण्यात आल्याचे मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी असं देखील सांगितलं की, जानेवारी २०२७ पर्यंत सिंहस्थाची सर्व विकास कामे पूर्ण होणार…
भालेकर शाळा पाडली जाणार असली तरी त्या ठिकाणी पुन्हा नवी शाळाच उभारली जाणार, शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन. नाशिककरांच्या भावना लक्षात घेऊन शाळेच्या भवितव्याबाबत आशेचा किरण निर्माण.
नाशिकच्या चांदवडमध्ये सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. संतप्त माहेरच्यांनी सासरच्या दारातच तिची चिता पेटवली. सहा सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू.
मंत्री नितेश राणे यांचा नाशिक दौऱ्यात मोठा इशारा: कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकाने लागतील. त्यांनी बोगस मतदान, इंदुरीकर महाराजांवरील टीका आणि 'जिहादी हिरवे साप' यांवरून विरोधकांवर सडकून टीका केली.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उत्तर-दक्षिण जोडणी, २५ किमी लांबीच्या उत्तन-विरार सागरी सेतूला वाढवण बंदरापर्यंत विस्तार. तसेच नाशिक कुंभमेळा २०२७ साठी रिंग रोड आणि पुणे मेट्रोचे काम ३ वर्षांत पूर्ण…
धारधार शास्त्राने घरांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. यात गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा गोळीबार नेमका कोणी केला आणि का केला याचा तपास पोलीस…
मालेगावात लहान मुलांच्या वादातून दोन गटांत गोळीबार आणि हाणामारी झाली. मुख्य आरोपी मेहताब अलीला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र कमी होणार आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यभरात थैमान घातले. ऑक्टोबरच्या अवकाळी पावसात गत ९ दिवसात १ हजारहून अधिक हेक्टरवरील कांदा रोप पाण्याखाली गेले...
नाशिकमधील साधूग्रामसाठी १ हजार १५० एकर जागा अपेक्षित आहे. सध्या ३७७ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी ९४ एकर जागेचे भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली.