पुणे: पुण्यातील भारती हॉस्पिटलमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
डाॅ. अंकिता अर्पित ग्रोवर (वय 36) यांनी या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र वैद्यकीय संस्था अधिनियम आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याच्या घटनेवरून संबंधित नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना कशी घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील भारती हॉस्पिटलमध्ये तेजराज जैन (वय ८६) यांचे उपचारादरम्यान मंगळवारी (७ जानेवारी) मृत्यू झाला. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे जैन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
Pune Crime: पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून युवकाने उचलले टोकाचे पाऊल
तोडफोड आणि धक्काबुक्कीची घटना
नातेवाईकांनी बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात सुरक्षारक्षक तृप्ती लोखंडे, श्रीदेवी डोईफोडे, निर्मला लष्कर, तसेच कर्मचारी सुनील दाते, अतुल शिंदे, चैतन्य दधस, प्रशांत ओव्हाळ यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यावेळी त्यांनी लाकडी स्टूल उचलून केबिनच्या काचांवर फेकून मारला.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रुग्णालय प्रशासनाने अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अमरावती रोडवर असलेल्या एका गावातून परतवाडा येथे कोचिंगसाठी आलेल्या शाळकरी मुलींचा पाठलाग करणे, फोटो काढणे, अश्लील कृत्य करणे आणि छेडछाड केल्याप्रकरणी मदन इंजिनिअरिंग वर्क्सचे संचालक व चालकावर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना फोन करून घटनेची माहिती दिली असता हा प्रकार उघडकीस आला. पालकांनी घटनास्थळ गाठून आरोपीला रंगेहात पकडले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. विद्यार्थिनींनी सांगितले की, आरोपी दररोज त्यांचा पाठलाग करत असे आणि अश्लील हावभाव करत त्यांचे फोटो काढायचे. परतवाडा बसस्थानकात उतरल्यानंतर बाजार समिती रस्त्यावरून जात असताना आरोपी त्यांचा पाठलाग करत आणि वेल्डिंग वर्कशॉपमधून त्यांना पाहून अश्लील कृत्य करत असत.
घटनेच्या दिवशी विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना दुचाकी आणि चारचाकीवरून दोन जण आपला पाठलाग करत असल्याची माहिती दिली. पालकांनी तत्काळ बसस्थानक गाठले. नागरिकांच्या मदतीने दोघांनाही पकडले. चौकशीत दोघेही मदन इंजिनीअरिंग वर्क्सचे संचालक व चालक असल्याचे समोर आले. पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर परतवाडा पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.