shraddha walker murder case repeated crime brutal murder of woman shakes malegaon tehsil the body of a dahidi farmer woman was cut into pieces and killed nrvb
मालेगाव : एका शेतकरी महिलेचा (Farmer Woman) अतिशय क्रूरपणे खून (Very Brutally Murdered) झाल्याची घटना तालुक्यातील दहीदी (Dahidi) येथे घडली असून या घटनेने दहीदी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुमनबाई भास्कर बिचकुले(Sumanbai Bhaskar Bichkule) (२९) रा. दहीदी ता. मालेगाव (Malegaon Tehsil) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून शेताजवळ असलेल्या जंगलात या महिलेच्या शरीराचे तुकडे करून फेकून देण्यात आले होते (The woman’s body was cut into pieces and thrown away). या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील दहीदी गावाजवळ असलेल्या शेतात बिचकुले यांचे घर असून सोमवार दि.३० रोजी सकाळी सुमनबाई पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती भास्कर हे मका विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. सायंकाळी भास्कर घरी आल्यावर पत्नी घरी का आलेली नाही म्हणून शेतात बघण्यासाठी गेले.
शेतात शोधाशोध केली असता त्या सापडत नसल्याने परिसरातील शेतातील शेतकऱ्यांना बोलावून त्यांचा शोध सुरु केला असता शेतात असलेली पावडी रक्ताने माखलेली दिसली. अखेर सायंकाळी उशिरा शेतापासून सुमारे १ किमी अंतरावर असलेल्या जंगलात सुमनबाई यांच्या शरीराचे मुंडके, धड, पाय वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अतिशय क्रूरपणे त्यांच्या खून करण्यात आल्याने परिसरात भीती पसरली आहे.
[read_also content=”अहो आश्चर्यकारक! कामगारांची ददातच मिटली!! कंपनीने बोनस म्हणून दिले ७० कोटी रुपये, तेही हार्ड कॅश, लोकांनी ते पोत्यात भरून-भरून नेले घरी https://www.navarashtra.com/viral/viral-news-chinese-company-puts-mountain-of-cash-to-distribute-70-crores-in-40-employees-as-bonus-nrvb-366162.html”]
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस श्वानपथकासह दाखल झाले होते. रात्री उशिरा मृतदेह मालेगावी आणण्यात आला. मंगळवारी मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे.
भास्कर बिचकुले त्यांचे कुटुंबीय शेती करतात. ते चार भावंड असून गावात त्यांचे घर असून शेतावर देखील घर होते. येथे बराचवेळा भास्कर व त्यांच्या पत्नीच राहत असत सोमवारी देखील ते दोघेच शेतावर होते. पती मका विक्रीसाठी बाहेरगावी निघून गेले तर त्या शेतात पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. परंतु त्यांच्यासोबत अशी क्रूरता होईल अशी कल्पना देखील बिचकुले कुटुंबाने केली नव्हती. पंचक्रोशीत देखील या अमानवीय घटनेने नागरिक हादरले असून दहशत पसरली आहे.
सुमनबाई भास्कर यांची पाचही मुले आईच्या मायेला पारखी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे. या घटनेमागील नराधम कोण आहेत याच शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी दहीदीकरांनी केली आहे. दरम्यान चोवीस तास उलटून देखील गुन्हा दाखल करण्याच्या पलीकडे तपासात फार काही पोलिसांच्या हाती न लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
[read_also content=”कल्याणच्या डॉ सोनाली पितळे-सिंग ठरल्या मेडीक्वीन सौंदर्यस्पर्धेच्या ‘मिसेस महाराष्ट्र’ २०२३-२४ https://www.navarashtra.com/maharashtra/kalyans-dr-sonali-pitale-singh-adjudged-mrs-maharashtra-2023-24-of-mediqueen-beauty-contest-also-won-the-title-of-outstanding-talent-and-mrs-bold-and-beautiful-nrvb-366113.html”]
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. गुन्ह्याची उकल होण्याच्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
– अनिकेत भारती, अपर पोलीस अधिक्षक , मालेगाव