मुंबई : दिल्लीतीस श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण उघडकीस येऊन एक महिना झाला आहे. या प्रकरणी रोज नवे नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी रोज काही ना काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder Case) हिचे वडिल विकास वालकर (Vikas Walkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्या आफताब पूनावाला याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली त्यांनी केली.
[read_also content=”दिल्लीत पुन्हा हत्याकांड! सार्वजनिक शौचालयात तीन वर्षीय चिमुकल्याचा आढळला मृतदेह https://www.navarashtra.com/india/a-three-year-old-boys-body-was-found-in-a-public-toilet-nrps-352097.html”]
श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणाले, मी आज माझी मुलगी श्रद्धा वालकर हिच्या मृत्यू बद्दल मी बोलणार आहे. दिल्लीचे गव्हर्नर यांनी मला आश्वासन दिले आहे की मला न्याय मिळवून देणार आहे. त्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील मी भेट घेतली आहे. किरीट सोमय्या हे माझ्या घरी आले होते, तसेच निलम गोऱ्हे यांचेही आभार विकास वालकर यांनी व्यक्त केले.
आफताब पूनावाला याला कठोर शिक्षा व्हावी, सोबतच आफताबच्या कुटूंबातील सदस्यांची सुद्धा चौकशी केली जावी व त्यांना सुद्धा शिक्षा द्यावी. या कटात जे कोणी सामील असतील त्याचा तपास करून त्यांना शिक्षा असावी. अशी मागणी विकास वालकर यांनी केली.
आफताबने नार्को टेस्टमध्ये सांगितले की, त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या हाताचे आधी तुकडे केले. त्यासाठी त्याने चायनीज चाकूचा वापर केला. याच शस्त्राने त्याने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले. तसेच तिच्या हत्येनंतर श्रद्धाचा मोबाईल अनेक महिने आपल्याजवळ ठेवला होता. तसेच मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं तेव्हा देखील श्रद्धाचा मोबाईल आपल्याकडेच होता. मात्र नंतर आपण श्रद्धाचा मोबाईल मुंबईतील समुद्रात फेकला. दरम्यान, नार्को टेस्टमध्ये त्याने श्रद्धाचा शरीर कापलेला छोटा करवत कुठे फेकल्याचे सांगितले, पोलीस आता त्या ठिकाणी त्या शस्त्राचा शोध घेत आहेत.