Solapur Crime: तरुण वकिलाचा राहत्या घरी गळफास घेत टोकाचा निर्णय; चिठ्ठीत आईला ठरवलं जबाबदार

सोलापूर शहरातील 32 वर्षीय तरुण वकील सागर मंद्रूपकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी आईकडून होणाऱ्या दुजाभावामुळे आत्महत्या केल्याचं लिहिलं असून पोलिस तपास करत आहेत.
crime (फोटो सौजन्य: social media)
Published on: 
Updated on: 
  • सागर मंद्रूपकर यांनी राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने आत्महत्या केली.
  • आत्महत्यापत्रात आईला जबाबदार ठरवले असून पोलिस तपासात आहेत.
  • काही दिवसांपूर्वी त्यांचा पोलिसांशी वाद झाल्याने मानसिक तणावाची शक्यता.

सोलापूर: सोलापुरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुण वकिलाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी (12 नोव्हेंबर) दुपारी घडली. टोकाचे निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचे नाव सागर श्रीकांत मंद्रूपकर (वय 32, रा. समर्थ सोसायटी, एसआरपीएफ कॅम्प, विजापूर रोड) असे आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली होती. या चिठ्ठीत त्याने आपल्या आईवर गंभीर आरोप केले आहे.

काय घडलं नेमकं?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. सागर मंद्रूपकर यांनी बुधवारी दुपारी आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर दोरीच्या साहाय्याने स्लॅबवरील लोखंडी हुकाला गळफास घेतला. काही वेळानंतर घरच्यांच्या लक्षात ही घटना आली. त्यांना खाली उतरवून तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

चिठीत आईवर गंभीर आरोप

पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाले. त्या चिठ्ठीत सागर यांनी लिहिले आहे की, “आईकडून होणाऱ्या सततच्या दुजाभावामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला ती जबाबदार आहे. माझ्या मृत्यूनंतर तिला कठोर शिक्षा करा.” या मजकुरावरून कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पूर्वी पोलिसांशी झाला होता वाद

अॅड. सागर मंद्रूपकर यांचा काही दिवसांपूर्वी पोलिसांबरोबरही काही वाद झाला होता. हे वादाचं प्रकरण सोलापूर बार असोसिएशनपर्यंत पोहोचले होते. त्या वादामुळे सागर मानसिक ताणाखाली होते का, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. पोलिसांनी या सर्व बाबींचा तपास सुरू केला असून आत्महत्येचे नेमके कारण समोर येणे बाकी आहे. तरुण वकिलाने आत्महत्या केल्याने सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

💡Frequently Asked Questions

Que: सागर मंद्रूपकर कोणत्या व्यवसायात होते?
Ans: वकील

Que: आत्महत्येच्या चिठ्ठीत कोणावर आरोप आहे?
Ans: आईवर

Que: ही घटना कोणत्या शहरात घडली?
Ans: सोलापूर