Solapur Crime News: सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हिंगणी गावात पित्याने आपल्या दोन ८ वर्षीय मुलांची विहिरीत ढकलून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पित्याला बार्शीतून अटक केली आहे.
करमाळा तालुक्यातील केत्तूर येथे रागाच्या भरात बापाने सात वर्षांच्या जुळ्या चिमुरड्यांना विहिरीत ढकलून हत्या केली. घटनेनंतर आरोपीने विष प्राशन केले. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
मंगळवेढ्यात एसटी बस कंडक्टरने पास नसल्याच्या कारणावरून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला थेट हायवेवर उतरवल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सोलापूरमधील सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला येत्या 12 जानेवारी 2026 रोजी सुरुवात होणार आहे. या यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो देखील आयोजित करण्यात आला आहे.
वाढवण बंदर आणि मुंबई-दिल्ली महामार्गाशी जोडले जाणार आहे, अशी घोषणा करण्याबररोबरच शहराला दररोज पाणीपुरवठा आणि यंत्रमागधारकांसाठी इचलकरंजी पॅटर्न राबविणार असल्याचेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
Local Body Election: राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत.
सोलापुरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस पुत्र स्वप्निल काळे याने ओळखीचा गैरफायदा घेत शिक्षिका वासंती येळे यांची सोनं, कार व रोख रकमेतून सुमारे 74.67 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप…
निवडणुका जिंकण्यासाठी जर खून होण्याची परिस्थिती निर्माण होत असेल, तर अशा निवडणुकाच नकोत.अशा तीव्र शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली.
वीज गावात पोहोचण्याआधीच्या काळात सोलापूरच्या ग्रामीण भागात घडलेली ही धडकी भरवणारी घटना आहे. रात्री उशिरा घरी परतताना राजवीर, रमेश आणि रुद्राक्ष या तिघांनी भररानातून जाणारी वाट निवडली.
सोलापुरात राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची धारदार शस्त्राने हत्या झाली. उमेदवारी अर्ज माघारीवरून वाद उफाळला. भाजप उमेदवारासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूरच्या वळसंग गावात अनैतिक संबंधाच्या संशयातून लक्ष्मण वाघमारे (35) याचा निर्घृण खून झाला. आठवडा बाजारात आरोपीने कोयत्याने हल्ला करून दगडाने ठेचले. परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिस तपास सुरू आहे.
Nashik Solapur highway project: नाशिक ते अक्कलकोट हे प्रवासाचे अंतर तब्बल २०१ किलोमीटरने कमी होणार आहे. सध्या या प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत १७ तासांची घट होईल (सुमारे ४५% वेळेची बचत).
सोमवार पर्यंत महापालिके निवडणुकीसाठी ४०० च्यावर अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने एकाच दिवशी किमान १००० अर्ज दाखल होतील अशी गर्दी दिसून आली.
सोलापुरात महापालिका निवडणुकीची तयारी करणारे तृतीयपंथी उमेदवार अय्युब सय्यद यांचा घरात उशीने तोंड दाबून खून झाला. गळ्यातील सुमारे 50 तोळे सोनं लुटलं गेलं. CCTVत तीन संशयित दिसत असून तपास सुरू…
सोलापुरात महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी व्यक्ती अय्युब सय्यद यांची निर्घृण हत्या झाली. रात्री घरात शिरलेल्या तीन अनोळखी इसमांचा सीसीटीव्हीत माग कॅद; पोलिसांचा तपास सुरू.