अंजली दमानियांच्या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर काही गंभीर आरोप केले आहेत. बीड जिल्ह्यातून धमकीचे फोन येत असल्याचा आरोप केला आहे. पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या माणसांकडून मला सातत्याने धमक्या येत आहे. धमक्यांचे फोन येत आहेत. अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर हे आरोप केले आहेत. यासोबत त्यानी काही पुरावेही दाखवले आहेत.
अंजली दमानिया पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या, “मी कुठल्याही समाजाविरोधात बोलले नाही, मी माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी माझ्या ट्विटर हँडलवर दोन ट्विट्सही केलेत. पण मी कधीही वंजारी समाजाच्या विरोधात बोलले नाही. वंंजारी समाजाचा वापर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंकडून केला जात आहे. यात काहीही शंका नाही. नरेंद्र सांगळे नावाचा माणूस उठसूट फोन करत सुटलाय. त्यांनी माझा व्हॉट्सअनप नंबर सोशल मीडियावर टाकलाय आणि उठसूट फोन करत आहेत. अंजली दमानिया फोन उचलत नाहीत तोपर्यंत कॉल करत राहा खंड पडता कामा नये, असे त्याने पहिली पोस्ट टाकली आहे. त्यानंतर माझा नंबर टाकून दुसरी पोस्ट टाकली आहे. ” आम्ही चांगल्या चांगल्याचा बाजार उठवला, तुझाही उद्धार होईल. बाजारू कार्यकर्ती,” असे ट्विट्स माझ्या नावाने टाकायला सुरूवात केली.
बांगलादेश खरेदी करणार पाकिस्तानच्या ‘मित्रा’कडून रणगाडे; जाणून घ्या का वाढला
त्यानंतर सुनील फड यांच्या फेसबुकवर माझ्या बाबात अश्लील आणि घाणेरड्या भाषेत पोस्ट केल्या, त्यानंतरही त्याच्या पोस्टवर तशाच घाणेरड्या कमेट्सही आल्या, त्यांनी सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं. मला दिवसाला 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही 700-800 कॉल्स आले, त्यामुळे आज चौथ्या दिवशी मी ही पत्रकार परिषद घेत आहे. आजही ते फोन बंद झालेले नाहीत.
मी मॉरिशिअसला स्कुबा डायव्हिंगला गेले होते. त्यातलाच एक फोटो काढून त्यांनी फेसबूकला टाकला, त्यावर घाणेरडी कमेंट करत त्या सुनील फड यांनी फेसबूकवर टाकले आहे. सुनील फड यांना वंजारी समाजाबद्दल आस्था असती तर त्यांनी हे केलं नसतं. उलट जोजो खरा वंजारी आहे तो म्हणाला असता ताई मुद्दा योग्य आहे. सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे, सर्व उच्च पदावर वंजारी समाजातील लोक असतील तर ते चुकींच आहे. देश 18 पगड जातीचा सर्व समाजाचा आहे. प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे.
ऑफिसमध्ये काम करताना भूक लागल्यानंतर बिस्किटांऐवजी करा ‘या’ हेल्दी स्नॅक्सचे सेवन
आज महाराष्ट्रात पाहिल तरं जोजो आमदार-खासदार येईल, तो त्यांच्या त्यांच्या मर्जीतील लोकांना निवडताता त्यांच्या समाजातील लोकांना निवडतात, त्यामुळे इतर समाजातील लोकांना न्याय मिळत नाही. हे 100 टक्के खरं आहे. सुनील फड यांनी माझा फोटो सोशल मीडियावर टाकला, त्यावर घाम कमेटं केली. अशा अश्लील लोकांना आपल्या राज्याची सत्ता द्यायची. ADR च्या रिपोर्टनुसार आज महाराष्ट्राच्य विधानसभेतील 288 पैकी 118 आमदारांवर खून, अपहरण, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांच्या विरोधात आवाज उठवला तर ते धमक्या देणार, मानसिक छळ करणार. ज्यांनी ज्यांनी धमक्या दिल्या. ते सर्वजण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत. माझ्याकडे या सर्वांचे पुरावे आहेत.