मेहुणी पेटली जिद्दीवर, पण मोठ्या बहिणीने असा निर्णय घेतला की सर्वांनाच बसला धक्का
मेहुणी आणि जीजूचं हे नातं प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण असतं. हे नातं अनेकदा थट्टामस्करीने भरलेले असते. पण यूपीतील अमरोहा येथून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. मेहुणीचं तिच्या मेहुण्यावरच प्रेम जडलं. मग प्रेम इतकं वाढलं की ती विसरली की हा माणूस तिच्या बहिणीचा नवरा आहे. दोघे एकत्र राहू लागल्यावर त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. काय आहे नेमकं प्रकरण?
उत्तर प्रदेशातील अमरोहा नगर कोतवाली परिसरात दोन वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाच्या मोठ्या मुलीचे लग्न काशीपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाशी झाले होते. लग्नानंतर पती-पत्नीच्या आनंदी आयुष्यात एका नवीन पात्राचा प्रवेश झाला. तो नवीन पात्र दुसरं तिसरं कोणी नसून पत्नीची बहिण होती. वर्षभरानंतर मेहुणी आणि जीजूमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. घरी कुणालाही याची कल्पना नव्हती. दोघेही गुपचूप भेटत असत आणि कधीकधी मेहुणी तिच्या बहिणीला भेटण्याच्या बहाण्याने जीजूच्या घरी येत होती.
अवघ्या एक वर्षानंतर जीजू आणि पत्नीची बहिण म्हणजे मेहुणीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.परिस्थिती अशी आहे की, दोघांनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर मेहुणीने बहिणीकडे जाऊन सांगितले, मी लग्न करणे ते फक्त जीजू बरोबर… नाहीतर मी अविवाहित राहीन. हे ऐकताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. कुटुंबीयांनी धाकट्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकून घेयाला तयार नव्हती. यावर मोठ्या बहिणीने घेतलेल्या निर्णयाने कुटुंबाला आणखी धक्का बसला.
मोठी बहिण धाकट्या बहिणीला सह-पत्नी म्हणून दत्तक घेण्यास तयार झाली. मेहुणी आणि जीजू तिच्या निर्णयावर खूश झाले. पण कुटुंब अजूनही या नात्याविरुद्ध आहे. ते म्हणतात की हे करणे चुकीचे आहे.
दोघीही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. मग एके दिवशी अचानक मेहुणी तिच्या बहिणीच्या घरी आली आणि जीजूसोबत राहण्याचा आग्रह करू लागली. बहिणीने धाकट्या बहिणीकडून हे ऐकले तेव्हा ती स्तब्ध झाली. तिला वाटले की बहीण मस्करी करत आहे. पण जेव्हा ती बराच वेळ तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहिली, तेव्हा बहिणीचा पती ही तेच म्हणू लागला- मलाही मेहुणीवर प्रेम आहे. मला तिच्यासोबत राहायचे आहे. त्यानंतर हे प्रकरण दोन्ही कुटुंबातील लोकांपर्यंत पोहोचले.
कुटुंबियांना या प्रकरणाची माहिती मिळतात संपूर्ण कुटुंब मोठ्या मुलीच्या घरी पोहचले. त्यांनी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. पण मेहुणी आणि जीजू त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यानंतर बहिणीने असा निर्णय जाहीर केला ज्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. बहिणी म्हणाली- मी माझ्या बहिणीला माझ्यासोबत ठेवण्यास तयार आहे. कुटुंबातील सदस्य म्हणाले- मुलगी, तू काय म्हणतेस? बहीण म्हणाली- काही हरकत नाही. मी हे नाते स्वीकारण्यास तयार आहे. हे ऐकून मात्र मेहुणी आणि जिजू दोघेही आनंदी झाले. त्याच वेळी, कुटुंबातील सदस्य अजूनही दोघांनाही पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता, या प्रेमकथेची सर्वत्र चर्चा होत आहे.