Chhatrapati Sambhaji Nagar News: शिवसेना शिंदे गटाचे नेते सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले अशा नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधीच कचाट्यात सापडले आहेत. असे असतानाच आता आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. शिंदे गटाचे खासदार संदीपन भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचे चालक जावेद शेख हे हिबानामा केलेल्या जमिनीच्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर संदीपान भुमरे अ़टम
या प्रकरणात यापूर्वी आयकर विभागाने शेख यांना नोटीस बजावली होती. आता या हिबानामा केलेल्या जमिनीची नेमकी किंमत किती, हा प्रश्न उभा राहिला आहे. या प्रकरणाचा तपास करताना छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेलाही याची शंका आली. त्यानुसार, जमिनीचे शासकीय मूल्यांकन मिळवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने महसूल विभागाला लेखी पत्र दिले आहे.
Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, राउंड ट्रिप तिकिटे एकत्र काढल्यास मिळणार २०% सूट
हिबानामा (Hibanama) म्हणजे एखाद्या व्यक्तीने मुस्लिम कायद्यानुसार आपली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला भेट म्हणून देणे हा कायदेशीर करार आहे. या करारात कोणतीही आर्थिक देवाणघेवाण किंवा परतफेड नसते. हिबा’ हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ भेट देणे (Gift) असा होतो. मुस्लीम कायद्यात हिबा ही संकल्पना विशेष महत्त्वाची मानली जाते, तरीही काही वेळा ती सर्वसामान्य कायदेशीर व्यवहारातही वापरली जाते. मुस्लीम कायद्यानुसार, हिबानामा म्हणजे कोणत्याही मोबदल्याशिवाय, स्वतःच्या मालकीची वस्तू, मालमत्ता किंवा जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर देण्याचा व्यवहार. हिबा वैध ठरण्यासाठी काही अटी आवश्यक असतात
मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागाकडून जावेद शेखच्या नावावर हिबानामाद्वारे मिळालेल्या जमिनीची अधिकृत किंमत समोर आली आहे. या जमिनीची शासकीय किंमंत तब्बल कोटी, ६९ लाख, ५१ हजार ४०८ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे, तर बाजारभावानुसार ही जमीन अंदाजे दोन हजार कोटींची असल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी जावेद शेकला आयकर विभागाने नोटीसही बजावली होती. तसेच, महसूल विभागाने या प्रकऱणाची चौकशी करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे जावेद शेखसह आता संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्याकडेही संशयाची सुई वळली आहे.
जावेद शेखच्या नावावर एवढी जमीन असताना या जमिनीचा महसुलही बुडवल्याची माहिती आहे. जमिनीचा हिबानामा झाला असतानाही शासनाचा महसूल कसा बुडाला असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या जमिनीची शासकीय किंमन २४१ कोटी ६९ लाख ५१ हजार ४०८ कोटी रुपये आहे. याच खरेदीखत झाले असते तर सरकारला त्याची स्टॅम्प ड्युटी म्हणजेत दस्तावेज नोंदणी मुद्रांक महसूल जवळपास १७ कोटी रुपये इतका मिळाला असता. तर महापालिकेला संरक्षण भिंत बांधण्यासाठीच एक-दिड कोटी रुपये मिळाले असते. हिबानामा झाल्यानंतर शासनाचा इतका महसूल बु़डाला.
माहितीनुसार, हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजाने तब्बल 150 कोटी रुपयांची तीन एकर जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या चालक जावेद शेख यांच्या नावाने भेट (हिबानामा) स्वरूपात दिली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील कोट्यवधींची ही जमीन जावेद शेख यांच्या नावावर गेल्यानंतर प्रकरण चर्चेत आले. या व्यवहाराच्या चौकशीसाठी आयकर विभागाने जावेद शेख यांना नोटीस बजावून 8 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते चौकशीसाठी गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितल्याची चर्चा सुरू आहे.