Uttar Pradesh Crime: सून प्रियकरासोबत घरी परतली, सासऱ्यांना आला राग, लोखंडी रॉड घेतला अन्... प्रियकराचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात सुनेच्या प्रेमसंबंधातून धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर विधवा सुनेचे गावातील एका विवाहित व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोघे काही काळ गावाबाहेर राहून पुन्हा परतले. याच रागातून सासऱ्याने लोखंडी रॉडने दोघांवर हल्ला केला अन् होत्याच नव्हत झालं.
सून प्रियकरासोबत घरी परतली, सासऱ्यांना आला राग, लोखंडी रॉड घेतला अन्... प्रियकराचा जागीच मृत्यू
सून प्रियकरासोबत घरी परतली, सासऱ्यांना आला राग, लोखंडी रॉड घेतला अन्... प्रियकराचा जागीच मृत्यू (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • विधवा सुनेचे प्रेमसंबंध सासऱ्याला खटकले

  • लोखंडी रॉडने हल्ला करून प्रियकराची हत्या

  • उत्तर प्रदेशात धक्कादायक घटना

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात सुनेच्या प्रेमसंबंधातून धक्कादायक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. विधवा सुनेचे गावातील एका विवाहित व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याने संतप्त झालेल्या सासऱ्याने दोघांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात सुनेच्या प्रियकराचा जागीच मृत्यू झाला, तर महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.(Uttar Pradesh Crime)

नेमकं काय प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (27 नोव्हेंबर 2026) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास बांदा जिल्ह्यातील चौंसड गावात ही घटना घडली. राजकरन याने आपली विधवा सून विद्या (४२) आणि तिचा प्रियकर राममनोहर (४५) यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात राममनोहरचा जागीच मृत्यू झाला, तर विद्या गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच ओरन पोलीस चौकीचे प्रभारी उपनिरीक्षक बुद्धिसागर आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. जखमी महिलेला उपचारासाठी बांदा येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सून प्रियकरासोबत घरी परतली, सासऱ्यांना आला राग, लोखंडी रॉड घेतला अन्... प्रियकराचा जागीच मृत्यू
Love Marriage Dispute : वैजापूरमध्ये प्रेमविवाहावरून राडा! थेट पोलीस ठाण्यात दोन कुटुंबांत हाणामारी

तीन वर्षांपूर्वी पतीचे निधन

मिळालेल्या माहितीनुसार, विद्याचा पती कल्लू याचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर काही काळाने विद्याचे गावातील राममनोहर याच्याशी जवळचे संबंध निर्माण झाले. राममनोहर विवाहित होता. कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ते लपूनछपून भेटू लागले. सुरुवातीला या संबंधांची माहिती सासरच्या मंडळींना नव्हती.

गावातून पळून गेल्यानंतर पुन्हा परतले

काही काळानंतर राममनोहर हा विद्याला घेऊन गावातून निघून गेला. दोघे काही महिने गावाबाहेर राहिले. त्यानंतर गेल्या आठवड्यात ते पुन्हा गावात परतले आणि एकाच घरात राहू लागले. या प्रकाराची माहिती सासरे राजकरन यांना मिळाल्यानंतर ते नाराज असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी रात्री दोघे खोलीत झोपलेले असताना राजकरन याने लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राममनोहर याचा मृत्यू झाला, तर विद्या गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी राजकरन याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपीने नेमक्या कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या उद्देशाने हल्ला केला, याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येईल.

सून प्रियकरासोबत घरी परतली, सासऱ्यांना आला राग, लोखंडी रॉड घेतला अन्... प्रियकराचा जागीच मृत्यू
Crime News: नवरा आहे की राक्षस! पत्नीला बेशुद्ध करून 3 वर्षे अनोळखी पुरुषांकडून बलात्कार, व्हिडिओ बनवून ...; ६० हून अधिक गुन्ह्यांची कबुली