उत्तर प्रदेशमध्ये पोलिस प्रशासनाने गॅस सिलिंडरच्या बेकायदेशीर साठवणुकीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. पुरवठा विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री एका घरावर छापा टाकून ३२ एलपीजी सिलिंडर जप्त केले.
आध्यात्मिक गुरू आशुतोष ब्रह्मचारी यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. त्यांच्यावर रेल्वेमध्ये प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रतिक्रिया दिली.
उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात संपत्तीच्या वादातून एका तरुणाने आई-वडील, आजी व बहिणीची कुऱ्हाडीने हत्या केली. दोघे जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस तपास सुरू आहे.
उत्तर प्रदेश मध्ये सख्ख्या भावाने विवाहित बहिणीची गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले. अपहरणाची खोटी कहाणी रचून दिशाभूल करण्याचा प्रयत्न; मोबाईल लोकेशनवरून सत्य समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
उत्तरप्रदेशमध्ये वीटभट्टी मालक व साथीदारांनी कामगार महिलेचे अपहरण करून 12 तास अत्याचार केल्याचा आरोप आहे. तरी पोलिसांनी फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल केल्याने संताप व्यक्त होत असून आरोपी अद्याप फरार आहेत.
औरैयामध्ये तरुणीने प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी बेडवर सापाची कात, बांगड्या व सिंदूर ठेवून ‘नागीण’ बनल्याची अफवा पसरवली. पोलिस तपासात प्रेमसंबंधाचा खुलासा झाला असून तरुणीचा शोध सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये पत्नीने पुतण्यासह पतीच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. अनैतिक संबंधांमुळे पती अडथळा ठरत असल्याने त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली.
बरेलीत ९ वर्षांच्या प्रेमानंतर लग्न केलेल्या जितेंद्र यादवची पत्नी ज्योतीनेच गळा दाबून हत्या केली. आत्महत्येचा बनाव उघडकीस आला. पोस्टमॉर्टम, CDR व CCTVच्या आधारे पत्नी व कुटुंबीयांसह ३ जण अटकेत.
उत्तरप्रदेशातील फतेहपूरमध्ये गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी 25 हजार रुपये घेऊन निघालेल्या शेतकऱ्याची हत्या करून मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवण्यात आल्याचा संशय. घटनेनंतर गावात तणाव; पोलीस तपास सुरू.
सहारनपूरमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अशोक राठोड यांच्यासह त्यांच्या पत्नी, आई आणि दोन मुलांचा गोळ्या लागून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ३ पिस्तुलं जप्त केली असून…
उत्तर प्रदेशातील झाशीत एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेह जाळला. उरलेली हाडं लोखंडी पेटीत भरून पत्नीच्या घरी पाठवली. लोडर चालकाच्या सतर्कतेमुळे हा अमानुष प्रकार उघड झाला.
उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये 30 वर्षीय सिकंदर गुप्ताने आई आणि पत्नीची छतावर विटांनी ठेचून निर्घृण हत्या केली. कवटीतील मांस खाल्ल्याचा आरोप आहे. आरोपी ताब्यात असून मानसिक तपासणी सुरू आहे.
सीतापुरमध्ये रस्त्याच्या कडेला आढळलेला मृतदेह अपघाताचा नसून पत्नीने प्रियकरासोबत रचलेल्या खुनाचा असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला. ८ महिन्यांच्या लग्नानंतर पतीचा निर्घृण खून करून अपघाताचा बनाव करण्यात आला.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका तरुणाने प्रेमसंबंधांच्या संशयातून वहिनी व तिच्या प्रियकराची चाकूने निर्घृण हत्या केली. बहिणीवरही हल्ला करण्यात आला. आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन सरेंडर केले.
उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये इंजिनियर मुलाने घटस्फोटाच्या वादातून आई-वडिलांची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून गोमती नदीत फेकले. बहिणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत प्रकरण उघड केले.
उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये कौटुंबिक व जमिनीच्या वादातून संतप्त दिराने अमानुष कृत्य केले. तीन वर्षांच्या पुतणीचा गळा चिरून खून केला, तर पाच वर्षांच्या पुतण्याला दुसऱ्या मजल्यावरून फेकले. आरोपी अटकेत.
उत्तर प्रदेशातील बस्ती येथे ३ मुलांची आई प्रीतीची तिच्या प्रियकराने हत्या केली. विवाहबाह्य संबंधातून ती गरोदर राहिल्याने प्रीती लग्नासाठी दबाव टाकत होती. या दबावातून आरोपी दिलीपने चाकूने वार करून तिची…
नागपूरच्या इमामवाडा परिसरात एकतर्फी प्रेमातून नशेत असलेल्या सुरज शुक्लाने 17 वर्षीय विद्यार्थिनीवर हातोडा व धारदार शस्त्राने हल्ला केला. विद्यार्थिनी जखमी असून उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
झाशी जिल्ह्यात पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे व्यथित पती डालचंद्र अहिरवार यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी व्हिडिओद्वारे पत्नीवर गंभीर आरोप केले. पोलिस तपास सुरू असून FIR दाखल नाही.