लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य (Photo : Suicide)
लातूर : लातूरमध्ये तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. केवळ दोन मार्क्स कमी पडल्याने पोलिस भरती हुकली. त्यामुळे नैराश्येत येऊन 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘आरक्षण असते तर पोलिस भरतीत लागलो असतो, आई मला माफ कर’, अशी चिठ्ठी लिहित नागेश यादव (वय २३) या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली. या तरुणाच्या आत्महत्येमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : Sangli News : बारावी परीक्षेच्या तणावातून मिरजेत विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
अनेकदा प्रयत्न करूनही पोलिस भरतीचे स्वप्न अपूर्ण राहिले. तर यावेळी वेटिंगमध्ये असूनही केवळ दोन मार्कांनी पोलिस भरती हुकली. याच वैफल्यातून लातूरमध्ये तरुणाने आत्महत्या केली. औसा तालुक्यातल्या बोरफळ इथे ही घटना घडली. या तरुणाने शेतामध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. नागेश यादव या तरुणाच्या घरची परिस्थिती खूपच हालाखीची होती. त्याच्या कुटुंबाकडे फक्त एक एकर शेती आहे. मुलाने पोलिस व्हावे यासाठी त्याच्या आईने खूप मेहनत घेतली आणि खर्चही केला.
पाच ते सहा परीक्षांमध्ये एक ते दोन गुणांनी हुलकावणी दिली. यावेळी नागेश वेटिंगमध्ये होता. पण दोन मार्क्सने त्याची यावेळी देखील भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यामुळे नागेश नैराश्येत गेला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले.
बारावी परीक्षेपूर्वीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
सांगलीच्या मिरज शहरातही आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे. शहरातील भारतनगर परिसरातील विद्यार्थ्याने बारावी परीक्षेपूर्वीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना उघडकीस आली तेव्हा विद्यार्थ्याने अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रथमेश बाळासाहेब बिराजदार (वय १८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
अँगलला गळफास घेऊन आत्महत्या
प्रथमेश बिराजदार हा शहरातील भारतनगर येथे पालकांसमवेत राहत होता. तो मिरजेतील एका खासगी अकॅडमीत बारावीचे शिक्षण घेत होता. मंगळवारपासून बारावीचे पेपर होणार होते. दरम्यान, यापूर्वी सोमवारी सायंकाळी संबंधित अकॅडमीमध्ये बारावीचा पेपर कसा सोडवायचा, याबाबत माहिती देण्यात आली होती. नंतर अभ्यासासाठी घराच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीत गेला. नंतर त्याने खोलीतील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेदेखील वाचा : Kerala Crime News : विद्यार्थ्यांना नग्न करून गुप्तांगांवर लटकवले डंबेल, नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगचा भयानक प्रकार समोर