लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य (Photo : Suicide)
सांगली : शहरातील भारतनगर परिसरातील विद्यार्थ्याने बारावी परीक्षेपूर्वीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना उघडकीस आली तेव्हा विद्यार्थ्याने अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
हेदेखील वाचा : ‘व्हीआयपीच्या पोरासाठी जी तत्परता पोलिसांनी दाखवली ती संतोष देशमुख प्रकरणात का दाखवत नाहीत?; नाना पटोले यांचा हल्लाबोल
प्रथमेश बाळासाहेब बिराजदार (वय १८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रथमेश बिराजदार हा शहरातील भारतनगर येथे पालकांसमवेत राहत होता. तो मिरजेतील एका खासगी अकॅडमीत बारावीचे शिक्षण घेत होता. मंगळवारपासून बारावीचे पेपर दरम्यान, यापूर्वी सोमवारी सायंकाळी संबंधित अकॅडमीमध्ये बारावीचा पेपर कसा सोडवायचा, याबाबत माहिती देण्यात आली होती. अकॅडमीमधून प्रथमेश हा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी परतला. त्यानंतर तो अभ्यासासाठी घराच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीत गेला. नंतर त्याने खोलीतील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी पालकांनी प्रथमेश याला हाक मारली. परंतु, प्रथमेश याने कोणतेही उत्तर न दिल्यामुळे पालकांनी प्रथमेश याच्या खोलीत जाऊन पाहणी केली. त्यावेळी प्रथमेश याने अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास येताच पालकांना धक्काच बसला.
वडील मिरज कृषी विभागात सहाय्यक म्हणून कामाला
प्रथमेशचे वडील मिरज कृषी विभागात सहाय्यक म्हणून काम करतात. प्रथमेश हा अभ्यासातही हुशार होता. मात्र, बारावी परीक्षेच्या ताण-तणावामुळे त्याने परीक्षेपूर्वीच आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू होती. परंतु, त्याने नेमके कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पुण्यातही एकाची आत्महत्या
राज्यातील वेगवेगळ्या भागातून आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. आता कौटुंबिक कारणातून तरुणाने शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातच चिंचेच्या झाडाला गळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी भरदुपारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. सोहेल येणीघुरे (२८, रा. पाषाण) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
हेदेखील वाचा : 38th National Games : टेनिसमध्ये महाराष्ट्राला दोन रौप्यपदके! एकेरीत वैष्णवी आडकर, तर दुहेरी पूजा-आकांक्षा जोडीचे रुपेरी यश






