मुंबई: राज्यात काल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत राज्याच्या जनतेने महायुतील भरघोस यश दिले आहे. तर महाविकास आघडीचा सुपडा साफ झालेला आहे. महायुतीने 226 जागांवर बहुमत मिळवले आहे. तर महाविकास आघाडीला 50 हा आकडा देखील पार करता आलेला नही. अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याचे पहायल मिळाले. हा निकाल मान्य नसून, यामध्ये काहटरी गडबड असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. मात्र राज्याच्या जनतेने महाविकास आघाडीला नाकारले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीमधील दोन खासदारांची खासदारकी धोक्यात आलेली आहे.
महाविकास आघाडीला आलेले अपयश हे दोन नेत्यांसाठी संकटाचे ठरणार आहे. शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे यांच्या पक्षातील खासदार संजय राऊत आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेची टर्म मिळणे सध्यातरी संख्याबळ नसल्याने अवघड झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 20 कॉँग्रेसला 16 आणि शरद पवार यांच्या पक्षाला 14 जागा जिंकता आल्या आहेत. राज्यसभेत खासदार म्हणून जाण्यासाठी 43 जागांचा कोटा निर्धारित असतो. त्यानुसार महाविकास आघाडी मिळून एक सदस्य राज्यसभेवर पाठवू शकतो. सध्या तरी असे चित्र पाहायला मिळत आहे.
संजय राऊत यांची माजी सरन्यायाधीशांवर टीका
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. प्रतिष्ठेची लढाई म्हणून ओळखली जात असलेली यंदाची निवडणूक महायुतीने एका बाजूने जिंकली आहे. महायुतीने महाविकास आघाडीला अक्षरशः धुळ चारत घवघवीत यश मिळवले. महायुतीच्या या विजयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही झालं त्याला सर्वस्वी धनंजय चंद्रचूड जबाबदार असल्याची टीका केली आहे.
महाराष्ट्रतील 288 जागांपैकी 234 जागा मिळवून महायुतीने नवा विक्रम रचला आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. जोरदार प्रचारानंतर देखील महाविकास आघाडीला यश आले नाही. याबाबत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना जोरदार टीका केली. खासदार संजय राऊत म्हणाले, निकाल आधीच ठरला होता फक्त मतदान करुन घेतलं, मतदान होऊ दिलं. तसंच जे काही घडलं त्याला देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार आहेत. त्यांनी सरन्यायाधीश असताना जर वेळेवर आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला असता तर या गोष्टी घडल्याच नसत्या. तुम्ही निकाल देणार नसाल तर मग त्या खुर्च्यांवर का बसला होता? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.