‘सूरज चव्हाण झाला बाबा!’ कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Suraj Chavan and Sanjana: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणच्या घरी जन्माष्टमीच्या दिवशी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सूरज चव्हाण बाबा झाला आहे. सूरज चव्हाण आणि संजना यांच्या घरी लक्ष्मी आली आहे. याचा आनंद आता सर्वत्र व्यक्त केला जात आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @vetal7379 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सर्वजण आनंदी दिसत आहेत. सूरज, संजना आणि हॉस्पिटलमधील इतर सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. (फोटो सौजन्य: Instagram)
R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!
गेल्या अनेक दिवसांपासून सूरज आणि संजना यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. डोहाळे जेवण, फोटोशूट, सर्वच व्हिडीओंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजेच सूरज आणि संजना यांना मुलगा होणार की मुलगी याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहे. आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून सूरज आणि संजना यांच्या घरी कन्यारत्न झाले आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संजनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरात राधा आल्याच्या भावना संजनाने व्यक्त केल्या आहेत.
संजना आणि सूरज यांचा हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संजना आणि सूरज अतिशय आनंदी दिसत आहेत. तसेच त्यांच्या कुटूंबियांना देखील प्रचंड आनंद झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करून सूरज चव्हाणचे अभिनंदन केले आहे. एका यूजरने लिहीले आहे की, धनाची पेटी आली अभिनंदन. तर दुसऱ्या यूजरने लिहीले आहे की, जेवढे वाईट दिवस काढले त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस दिसुदे. आणखी एका यूजरने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, राधा राणी आली.
View this post on Instagram
A post shared by Sanjana Suraj Chavhan (@official_sanjana_suraj_chavhan)






