'इरावती' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर ( सौजन्य - सोशल मीडिया )
Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
चित्रपटात सतीश पुळेकर, अलका कुबल-आठल्ये, विजय गोखले, सुनील बर्वे, संतोष जुवेकर, जुई भागवत, स्वरदा करंदीकर, मृणालिनी जांभळे आणि अवंती सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभवी कलाकारांची दमदार फळी आणि नात्यांमधील भावविश्व उलगडणारी कथा यांमुळे ‘इरावती’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
निर्माते डॉ. दिनेश वैद्य म्हणाले, ‘इरावती’ ही केवळ एक चित्रपटाची कथा नसून, माणसांमधील नात्यांचा आणि भावबंधांचा शोध घेणारा अनुभव आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात नाती जपणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांचं महत्त्व जाणणं अधिक गरजेचं झालं आहे. प्रेक्षकांना आपल्या आयुष्याशी जोडणारा, मनाला स्पर्श करणारा आणि चित्रपट संपल्यानंतरही विचार करायला लावणारा आशय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘इरावती’ प्रेक्षकांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करेल, अशी आशा आहे.”
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक निलेश देशपांडे म्हणाले, “प्रत्येक नात्याला स्वतःची एक गोष्ट असते. या नात्यांमधील भावभावना, त्यात दडलेली ओढ आणि माणसांना एकमेकांशी जोडणारे अदृश्य धागे यांचा वेध ‘इरावती’मधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही कथा प्रेक्षकांना केवळ भावनिक अनुभव देणार नाही, तर आपल्या आयुष्यातील नात्यांकडे नव्याने पाहण्याची जाणीवही करून देईल, असा मला विश्वास आहे.”
‘इरावती’ चित्रपटाची कथा डॅा. दिनेश वैद्य यांची असून पटकथा नंदू परदेशी यांनी लिहिली असून, संवादलेखनाची जबाबदारी डॉ. दिनेश वैद्य आणि नंदू परदेशी यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण अनिकेत के यांनी केले असून, संकलन सुबोध नारकर यांनी केले आहे. पायलट साऊंडची जबाबदारी राशी बुट्टे यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शन महेंद्र राऊत यांचे असून, कार्यकारी निर्माता म्हणून संभाजी जायेभाये यांनी काम पाहिले आहे. संगीतदिग्दर्शन कमलेश भडकमकर यांचे आहे. मिक्सिंग इंजिनिअर म्हणून अभिजीत श्रीराम देव यांनी काम पाहिले आहे. वेशभूषा ममता मंडल आणि विदुला तामोरे यांनी केली असून, रंगभूषेची जबाबदारी सुदर्शन कुलाबकर यांनी, तर केशभूषेची जबाबदारी जयश्री नाईक यांनी सांभाळली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं दमदार मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे.






