Kushal Badrike on Atharva Sudame (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Kushal Badrike on Atharva Sudame (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अथर्व सुदामेने काही दिवसांपूर्वी मराठीतल्या अनेक कलाकारांना आपल्या घरी बोलावले होते. त्याने सगळ्यांना सांगितले होते की “सुदाम्यांकडे कांदेपोह्यांचा कार्यक्रम आहे, या सगळ्यांनी घरी.”नाव ऐकूनच एकदम घरगुती आणि आपुलकीचे वाटते. त्यामुळे कुशल बद्रिकेसह अनेक कलाकार आपुलकीने त्याच्या घरी गेले. सगळ्यांना वाटले की चला, भेट होईल, गप्पा होतील आणि गरमागरम कांदेपोहे खायला मिळतील.पण तिथे गेल्यावर वेगळाच प्रकार घडला. तिथे कोणालाच कांदेपोहे मिळाले नाहीत. सगळा प्रकार वेगळाच निघाला. कलाकारांना बोलावून त्यांचा एकप्रकारे अपमान केल्यासारखे झाले.
कुशलने व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितले. तो म्हणाला, “बघा, रिल्समध्ये आपण एकमेकांची फिरकी घेतो, मस्करी करतो, ते मी समजू शकतो. तो कंटेंटचा भाग आहे. पण प्रत्यक्ष घरी बोलावून पाहुण्यांचा असा अनादर करणे हे मला अजिबात पटले नाही. इतक्या वर्षात मला असा अनुभव कधीच आला नव्हता.”
तो पुढे म्हणाला, “माझा याला जाहीर आक्षेप आहे. बाकीचे कलाकार यावर काय बोलतील ते त्यांचे त्यांना माहित, पण मला हा प्रकार मनाला लागला. घरी बोलावून असे वागणे चुकीचे आहे.”कुशलचा हा व्हिडिओ येताच सोशल मीडियावर आग लागली. लोक कमेंट करू लागले. अनेकांना प्रश्न पडला की नेमके काय झाले?
हे प्रमोशन तर नाही ना?काही लोकांना असे पण वाटते की हा सगळा एखादा नवीन प्रोजेक्टचा प्रमोशनल स्टंट तर नाही ना? आजकाल सिनेमा किंवा वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी असे भांडणाचे व्हिडिओ केले जातात. हा पण त्यातलाच एखादा प्रँक असेल का? अशी चर्चा पण सुरू आहे.पण जोपर्यंत अथर्व सुदामे स्वतः यावर काही बोलत नाही, तोपर्यंत खरे काय ते कळणार नाही. अथर्वने अजून यावर काहीच उत्तर दिले नाहीये.
एक मात्र नक्की, महाराष्ट्राच्या लाडक्या कुशलला दुखावणे म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना दुखावण्यासारखे आहे. त्यामुळे लोक कुशलच्याच बाजूने उभे आहेत. आता बघूया, सुदाम्याच्या घरी कांदेपोह्यांचे नक्की काय झाले, हे लवकरच समोर येईल.






