Case No. 99 Marathi Movie (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
‘केस नं. ९९’ची कथा एका अनपेक्षित घटनेपासून सुरू होते. एका मृत्यूमुळे अनेक प्रश्न उभे राहतात. नेमकं काय घडलं, या घटनेमागे कोण आहे आणि समोर दिसणारं सत्य खरंच पूर्ण सत्य आहे का, असे प्रश्न कथेत महत्त्वाचे ठरतात. या प्रश्नांची उत्तरं शोधताना तपासाची दिशा बदलत जाते आणि प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होतं.
या चित्रपटात अजय पुरकर यांच्यासोबत चिन्मय मांडलेकर आणि मृण्मयी देशपांडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. या तिघांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र ते कोणती भूमिका करणार हे अद्याप गुलदस्तात आहे.
या चित्रपटचा ट्रेलर नुकताच लॉंन्च झाला. यामध्ये प्रकरणाचा शोध घेण्याचे सुरु आहे. तसेच नव-नवीन गुपिते उलगडणार आहे. तपास जसजसा पुढे सरकतो, तसतसा संशय वाढत जातो. प्रत्येक घटनेमागे काहीतरी वेगळं दडलेलं असू शकतं, अशी जाणीव ट्रेलर करून देतो. त्यामुळे प्रेक्षकांना पुढे काय घडणार, याचा अंदाज बांधण्याची संधी मिळते.
या कथेत केवळ गुन्ह्याचा शोध नाही, तर सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी धडपडही महत्त्वाची आहे. एखाद्या प्रकरणात दिसणाऱ्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवता येत नाही. काही प्रश्नांची उत्तरं शोधताना नव्या शंका निर्माण होतात. हाच या चित्रपटाचा मुख्य आधार असल्याचं ट्रेलरवरून जाणवतं.
अजय पुरकर यांनी सई अजय पुरकर यांच्यासोबत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अभिनयाचा अनुभव घेतल्यानंतर दिग्दर्शनाच्या माध्यमातून कथा मांडण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे ‘केस नं. ९९’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी पोस्टर आणि ट्रेलर पहिल्यावर या प्रकरणाचा शेवट कसा असेल याबद्दल कुतुहूल आहेत. संशयाच्या भोवऱ्यात नेमकं कोण अडकणार आणि मृत्यूमागचं खरं कारण काय, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. निर्मात्यांनी कथेबद्दल फारशी माहिती उघड न केल्यामुळे रहस्य कायम आहे.
‘केस नं. ९९’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर हा चित्रपट येत्या १६ ऑक्टोबर २०२६ ला अल्ट्रा झकास मराठी या ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्यामुळे घरबसल्या हा सस्पेन्स-थ्रिलर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल. रहस्य, तपास आणि अनपेक्षित घडामोडी आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट लक्षवेधी ठरू शकतो. आता अजय पुरकर यांचं दिग्दर्शन आणि या कथेत दडलेलं सत्य प्रेक्षकांना किती भावतं, हे प्रदर्शनानंतरच स्पष्ट होईल.






