Jay Jay Swami Samarth: ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये मोठा ट्विस्ट! शंकरने रुहीसमोर ठेवली संसार की स्वामीभक्ती निवडण्याची अट

Jay Jay Swami Samarth:
संसार वाचवण्यासाठी रुही उचलणार धाडसी पाऊल (फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
संसार वाचवण्यासाठी रुही उचलणार धाडसी पाऊल (फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Published on: 
Updated on: 

Jay Jay Swami Samarth: कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ ही लोकप्रिय मालिका सध्या भक्ती, प्रेम आणि नात्यांमधील संघर्षामुळे चर्चेत आहे. रुही आणि शंकर यांच्या सुखी संसारात आता मोठे वादळ निर्माण झाले आहे. स्वामींच्या कृपेने जुळलेल्या या नात्यात आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, रुहीला आपला संसार आणि स्वामींवरील श्रद्धा यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. आगामी भागांमध्ये या दोघांच्या नात्याची भावनिक परीक्षा पाहायला मिळणार आहे.

शंकरच्या मनात स्वामींबद्दल निर्माण झाली कटुता

मालिकेच्या आगामी भागांत शंकर गैरसमज आणि अपमानाच्या जाळ्यात अडकताना दिसणार आहे. विरोधकांच्या कारस्थानामुळे त्याच्या मनात स्वामींबद्दल कटुता निर्माण झाली आहे. याच रागातून शंकर रुहीसमोर संसार किंवा स्वामीभक्ती यापैकी एकाची निवड करण्याचा कठोर निर्णय मांडतो. त्यामुळे रुहीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

एकीकडे पतीचा संताप आणि दुसरीकडे आपल्या गुरूंवरील अढळ श्रद्धा, अशा परिस्थितीत रुही कोणाचीही साथ सोडण्यास तयार नाही. तिने स्वामींची भक्ती सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने तिच्या संसारावर संकट ओढवले आहे.

संसार वाचवण्यासाठी रुही उचलणार धाडसी पाऊल (फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Shubhankar Ekbote: ‘ईठा’मध्ये मराठी कलाकारांचा जलवा! सिद्धार्थ जाधवसोबत आणखी एक अभिनेता श्रद्धा कपूरसोबत शेअर करणार स्क्रीन

संसार वाचवण्यासाठी रुही उचलणार धाडसी पाऊल

शंकरला चुकीच्या मार्गावरून परत आणण्यासाठी आणि आपल्या नात्याचा सन्मान राखण्यासाठी रुही आता एक मोठे पाऊल उचलणार आहे. ज्या नात्याची सुरुवात स्वामींच्या साक्षीने झाली, त्याचा शेवटही त्यांच्याच दारात व्हावा, असा विचार करून रुहीने घेतलेला निर्णय सर्वांनाच धक्का देणारा ठरणार आहे. तिचा हा निर्णय शंकरला कोणत्या वळणावर घेऊन जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

रुहीची स्वामीभक्ती शंकरला पुन्हा योग्य मार्गावर आणणार?

आता रुही आपल्या संसाराला वाचवण्यात यशस्वी होणार का? शंकरला आपल्या चुकीची जाणीव होऊन तो पुन्हा स्वामींच्या भक्तीच्या मार्गावर येणार का? तसेच या कठीण प्रसंगातून स्वामी आपल्या लाडक्या भक्ताचे रक्षण कसे करणार, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागांत मिळणार आहेत.

‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका दररोज रात्री ८.१० वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. तसेच प्रेक्षकांना आपली आवडती मालिका कधीही आणि कुठेही जिओहॉटस्टारवर पाहता येईल.

संसार वाचवण्यासाठी रुही उचलणार धाडसी पाऊल (फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Ramayana GTA Style Game: ‘रामायण’चा आता गेमिंग विश्वातही डंका! GTA स्टाइल गेमसह थीम पार्क आणि म्युझियम उभारणार