Faisal Shaikh Wedding Photos: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सोशल मीडियाचा किंग, यूट्यूबर Mr. Faisu म्हणजेच फैसल शेख सध्या त्याच्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या, पण आता स्वतः फैजलने त्यावर शिक्कामोर्तब केला. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत फॅन्सना गोड बातमी दिली आहे. फोटो टाकताच काही मिनिटातच ते व्हायरल झाले आणि कमेंटचा पाऊस पडला. Faisal Shaikh Wedding Photos:
युविका चौधरीच्या एका व्लॉगमुळे या सगळ्या चर्चांना सुरुवात झाली. तिच्या व्लॉगमध्ये मागे एक सजवलेली लग्नपत्रिका दिसली होती. त्या पत्रिकेवर स्पष्ट लिहिले होते “Mr. Faisu आणि तान्या”. त्याच पत्रिकेवर मोहम्मद मुदस्सिर आणि निखत फातिमा यांची पण नावे होती. त्यामुळेच लोक अंदाज लावत आहेत की फैजलच्या बायकोचे खरे नाव निखत फातिमा आहे आणि तान्य हे तिचे लाडाचे किंवा टोपणनाव असावे. पत्रिका व्हायरल झाल्यापासूनच लोक सारखे विचारत होते की नक्की लग्न कधी आहे, मुलगी कोण आहे. पण फैजलने त्यावेळी काहीच सांगितले नव्हते.
“आणि आम्ही तुमची जोड्यांच्या रूपात निर्मिती केली” 🤍 | कुराण ७८:८ एका स्वप्नाचे वास्तवात रूपांतर झाल्याबद्दल अल्लाहचे आभार (अल्हम्दुलिल्लाह) 🤲🏻❤️ मदिनासारख्या सुंदर शहरात, माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत माझा ‘निकाह’ संपन्न झाला. हा एक असा आशीर्वाद आहे जो शब्दांत मांडता येणार नाही. आम्ही एकत्रपणे या सुंदर प्रवासाची सुरुवात करत असताना, कृपया आम्हाला तुमच्या दुआंमध्ये (प्रार्थनांमध्ये) लक्षात ठेवा. अल्लाह आमच्या या विवाहाला असीम प्रेम आणि बरकतीने (समृद्धी व आशीर्वादाने) भरभरून आशीर्वाद देवो. आमीन 🤍🕌” असे कॅप्शन फैसूने दिले आहे.
View this post on Instagram






