Madhuri Dixit: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Madhuri Dixit And Sonali Bendre : मराठीमधला सगळ्यात मोठा शो कोण होणार करोडपती आता नव्या धगात आणि नव्या रुपात येत आहे. पहिल्यांदाच करोडपतीची संपूर्ण धुरा एका अभिनेत्रीच्या हातात दिल्या आहेत. ती दुसरी-तिसरी कोण नसून लाखो दिलों की धक धक गर्ल माधुरी दीक्षित. येत्या 12 ऑक्टोबरपासून हा शो प्रेक्षकांच्या येणार असून हा शो ती होस्ट करणार आहे. यासाठी खुद महानायक अभिताभ बच्चन यांनी माधुरी दीक्षितला या नव्या प्रवासाठी शुभेच्छा दिल्या. शोच्या पहिल्याच भागात बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे येणार आहे. दोन सुंदर अभिनेत्री एकाच मंचावर येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये एक उत्सुकता वाढली. Madhuri Dixit:
माधुरी आणि सोनाली यांनी अनेक सिनेमे केले. मात्र या दोघींनी कधीच एकत्र काम केलं नाही. एकत्र स्क्रिन शेअर केली नाही. ही गोष्ट दोघींनाही खटकते. सोनाली बेंद्रे सेटवर म्हणाली, “I Just Love Her! माधुरीजी जे काही करतात ते मला खूप आवडते. मी खरंच त्यांची खूप मोठी फॅन आहे. माझ्यासाठी सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे माधुरी मॅमचा धाकटा मुलगा आणि माझा मुलगा दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात आहेत. त्यामुळे आम्ही शाळेत पालक म्हणून नेहमी भेटतो. पण आता KBC च्या सेटवर भेटल्यावर आणखी छान आठवणी बनतील.”
Kon Honar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’मध्ये मोठा बदल; बॉलिवूडची …
माधुरी म्हणाली, “मी आणि सोनालीने खरंच आजपर्यंत एकत्र काम केले नाहीये. पण अजून उशीर झालेला नाही. आज आम्ही दोघी या मंचावर एकत्र आलो आहोत आणि हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे.”
ती म्हणाली, “आम्ही शाळेत भेटतो पण पडद्यावर कधीच एकत्र आलो नाही. मी माधुरीजींच्या अभिनयाची, त्यांच्या डान्सची जबरदस्त चाहती आहे. जर कोणी लेखक किंवा दिग्दर्शक आम्हाला बघत असेल तर प्लीज आम्हा दोघींसाठी एक स्क्रिप्ट लिहा. मला माधुरीजींसोबत काम करायला खूप जास्त आवडेल.”
View this post on Instagram
प्रेक्षकांना काय बघायला मिळणार?12 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या करोडपतीमध्ये फक्त प्रश्न-उत्तरेच नाही तर असे अनेक खास एपिसोड पण असणार आहेत. माधुरी होस्ट असल्यामुळे शोमध्ये डान्स, मस्ती आणि इमोशनल क्षण पण जास्त बघायला मिळणार आहेत.
Madhuri Dixit: फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा निकाल लागताच स्टेजवर धुमाकूळ …
सोनाली बेंद्रे वाला एपिसोड हा प्रेक्षकांसाठी जणूकाही मेजवानी ठरणार आहे. दोन सुंदर अभिनेत्री पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत. दरम्यान या दोघींनी दिग्दर्शक एक खुली ऑपर दिली आहे की, प्लीज कोणीतरी एक आमच्यासाठी एक स्क्रिप्ट तयार करा.. आमच्या दोघींना एकत्र काम करायला खूप आवडेल. या दोघींच्या दिलेल्या खुल्या ऑफरला कोणता दिग्दर्शक प्रतिक्रिया देतो हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.






