(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
OTTवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘मिर्झापूर’ फ्रँचायझीचा आता मोठ्या पडद्यावर विस्तार होत आहे. ‘मिर्झापूर द मूव्ही’मध्ये कालीन भैय्या, गुड्डू पंडित आणि मुन्ना भैय्या यांच्या वर्चस्वाच्या लढाईची पुढची कहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामुळे ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे.
२. ‘हाउ टू रॉब ए बँक’
‘How to Rob a Bank’ हा अॅक्शन-ड्रामा थरार आणि मोठ्या जोखमीच्या दरोड्यांनी भरलेला आहे. रोमांचक घटनांनी भरलेली ही कथा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.
३. ‘जीवन या भीमा कौन?’
हास्य आणि हलक्याफुलक्या मनोरंजनाने भरलेला ‘जीवन या भीमा कौन?’ हा विनोदी चित्रपटही चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अर्शद वारसी दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
१. ‘जगमे संगीतम्’ – Amazon Prime Video
‘जगमे संगीतम्’ हा तेलुगू म्युझिकल ड्रामा आहे. ‘बंदिश बँडिट्स’पासून प्रेरित असलेल्या या कथेत शास्त्रीय संगीताचा वारसा लाभलेला बालू आणि पॉप गायिका पल्लवी यांची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. परंपरा, महत्त्वाकांक्षा आणि कौटुंबिक रहस्ये यांच्यातील संघर्ष या कथेत पाहायला मिळेल.
२. ‘धमाल ४’ – Netflix
चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ‘धमाल ४’ आता OTTवर येत आहे. अजय देवगण, अर्शद वारसी, जावेद जाफरी आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या कॉमेडी चित्रपटाचा आनंद आता घरबसल्या घेता येणार आहे.
३. ‘मेडे’ – Apple TV
‘मेडे’ या अॅक्शनपटाची कथा १९८७ सालच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका अमेरिकन पायलटचं विमान सोव्हिएत प्रदेशात कोसळतं. त्यानंतर एक माजी KGB एजंट त्याचा जीव वाचवण्यासाठी पुढे येतो. रायन रेनॉल्ड्स आणि केनेथ ब्रॅनाघ यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
४. ‘द कोर्ट’ – JioHotstar
‘द कोर्ट’ हा तमिळ कोर्टरूम ड्रामा आहे. या कथेत याझिनी नावाची तरुण वकील एका हाय-प्रोफाईल खटल्यात आपल्या अनुभवी वडिलांसमोर उभी ठाकते. बोलण्यात अडचण असूनही ती न्यायालयात आपली बाजू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करते.
५. ‘उन्मधम’ – SonyLIV
‘उन्मधम’मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची कथा पाहायला मिळते. आपल्या आगामी स्क्रिप्टसाठी प्रेरणा मिळवण्याच्या उद्देशाने तो एका जुन्या कोल्ड केसचा पुन्हा तपास सुरू करतो. तपास जसजसा पुढे जातो, तसतसा वास्तव आणि कल्पनारम्यतेमधील फरक धूसर होत जातो. या कथेत कुंचाको बोबन प्रमुख भूमिकेत आहेत.
६. ‘अर्ल मीट्स वर्ल्ड’ – Netflix
‘अर्ल मीट्स वर्ल्ड’ ही आठ भागांची डॉक्यु-सिरीज आहे. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर ॲलिक्स अर्लचं व्यावसायिक साम्राज्य, वैयक्तिक आयुष्य, हाय-प्रोफाईल ब्रेकअप आणि त्यानंतर झालेल्या चर्चांचा या सीरिजमध्ये आढावा घेण्यात आला आहे.
एकूणच, या आठवड्यात चित्रपटगृह आणि OTT अशा दोन्ही ठिकाणी मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वीकेंड घरबसल्या घालवायचा असेल किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायचा असेल, प्रेक्षकांसमोर अनेक पर्याय असणार आहेत.






