द ट्रेटर्समध्ये ५ खेळाडू एकाच वेळी बाहेर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सर्वात मोठा धक्का भागाच्या सुरुवातीलाच बसला, जेव्हा लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि शोमधील सर्वात प्रबळ स्पर्धकांपैकी एक मानली जाणारी श्वेता तिवारी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर आली नाही. Traitor ने रात्रीच्या अंधारात श्वेताचा काटा करून तिला खेळातून बाहेर काढले होते. श्वेताच्या बाहेर पडण्याने उर्वरित स्पर्धकांमध्ये स्पष्टपणे भीती आणि संताप दोन्ही निर्माण झाल्याचे दिसून आले आणि अनेकांनी यावेळी बदला घेण्याची शपथ घेण्यास सुरुवात केली.
शोमधील खरा ड्रामा तेव्हा सुरू झाला, जेव्हा सर्व स्पर्धक ‘सर्कल ऑफ शॉक’ दरम्यान एकत्र बसले. प्रश्नोत्तर सत्रादरम्यान, शहनील आणि क्रिस्टल डिसुझा यांना सकाळी मिळणाऱ्या पत्रांबद्दल विचारण्यात आले. क्रिस्टलने लगेच उत्तर दिले, पण शहनीलने सबबी सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली की, ती पत्रे पूर्ण वाचत नाही आणि फक्त पहिल्या तीन ओळी पाहते. तिच्या या उत्तरांमुळे इतर स्पर्धकांना संशय आला. शहनीलची चोरी रंगेहाथ पकडली गेली आणि सर्वांनी तिला मत देऊन बाहेर काढले.
शहनील बाहेर पडल्यानंतर, एकमेव उरलेली ट्रेटर, क्रिस्टल डिसूझाला नवीन जोडीदार निवडण्याची संधी मिळाली. क्रिस्टलने आपला डावा अत्यंत हुशारीने आखलेला यावेळी दिसून आला. या खेळीत, डिजिटल कंटेंट क्रिएटर रिदा थरानीला तिच्या टीममध्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला, जो रिदाने स्वीकारला. रिदा सामील होताच, त्यांनी शो ची हुशार गुप्तहेर, तान्या पुरी, हिच्या हत्येचा कट रचला, जिला क्रिस्टल आणि रिदाच्या योजनांची पूर्ण कल्पना होती.
या आठवड्याचा खेळ इनोसेंट्ससाठी अत्यंत कठीण ठरला. कॉफिन टास्क दरम्यान, रॅपर इक्का टास्क पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याने बाद झाला. दरम्यान, ‘सर्कल ऑफ शॉक’ मध्ये, गैरसमज आणि परस्पर संशयामुळे रिया चक्रवर्ती आणि कंटेंट क्रिएटर अंश हे दोन वरवर पाहता निर्दोष वाटणारे खेळाडू बाद झाले. दोन हत्या, दोन राऊंड-टेबल एलिमिनेशन आणि एका टास्कमधून बाहेर पडल्याने, एकूण पाच खेळाडू बाद झाले आहेत. ट्रेटर्समध्ये क्रिस्टल आणि रिदाची ही नवीन जोडी पुढे कोणती जादू घडवून आणेल, किंवा इनोसेंट्स त्यांच्या चुकांमधून शिकून ट्रेटर नक्की कोण हे उघडकीस आणतील का, हे पाहणे आता मनोरंजक ठरेल! प्रेक्षकांची उत्सुकता तर आता अगदीच शिगेला पोहचली आहे.






