(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
शोमध्ये करण जोहरने त्याला त्याच्या लग्नाच्या प्रस्तावाबद्दल विचारले, यावर विजयने सांगितले की त्याने १०० वेळा लग्नासाठी मागणी घाल असं त्याने रश्मिकाला सांगितले होते आणि जवळपास ती त्याला वर्षभर लग्नासाठी विचारत होती. या वक्तव्यानंतर विजयला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेकजण विजयला ‘रश्मिकाचे विजयवर प्रेम आहे, पण विजयचे स्वत:वर प्रेम आहे’ असं म्हणत ट्रोल करताना दिसत आहेत. काहीजण असेही म्हणत आहेत की रश्मिकाने थोडा आत्मसन्मान बाळगावा. इतकेच नाही, तर काही लोक विजयला धोक्याची घंटा म्हणत आहेत. तर काहींनी त्याला रेड फ्लॉग देखील म्हटलं आहे.
अभिनेता विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘रणबाली( Ranabaali) हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने सहा दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ४२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाची जगभरातील कमाई जवळपास ५९ कोटींच्या घरात आहे. चित्रपटातील रश्मिका आणि विजय यांच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे.






