नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ही परिस्थिती पाहून देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. सामान्य नागरिकांपासून ते प्रसिद्ध व्यक्तींपर्यंत अनेकजण आपापल्या परीने पूरग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच आत्ता बॉलिवूडमधील गायक विशाल मिश्राचे सुद्धा नाव जोडले आहे.
विशाल मिश्राने पूरग्रस्तांसाठी थेट मदतीचा मार्ग निवडला आहे. त्याने नेपाळ आणि आसाममध्ये विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमातून जमा होणारी रक्कम आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती आणि कॉन्सर्टची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसून लवकरचं सोशलमीडियावर जाहीर केली जाईल. त्याच्या या निर्णयाचे सोशलमीडियावर जोरदार कौतुक होत आहे. त्यांच्या या संगीताच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा त्याचा हा प्रयत्न अनेकांना भावला आहे.
विशालने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली. नेपाळमध्ये घडलेल्या घटनेने आपल्याला खूप दुःख झाले असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे या संकटात काहीतरी करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्याने आपल्या पोस्टमधून नेपाळ आणि आसाममध्ये कॉन्सर्ट करण्याची माहिती दिली. या कार्यक्रमातून मिळणारा पैसा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला जाणार असल्याचे त्याने सांगितले. तसेच या उपक्रमाबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
View this post on Instagram
विशालने आपल्या चाहत्यांना धीर देत, आपल्या परीने शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या छोट्याशा पण महत्त्वाच्या प्रयत्नामुळे संकटाच्या काळात कलाकार समाजासाठी कशा प्रकारे पुढे येऊ शकतात, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं
विशाल मिश्रा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. त्याच्या आवाजातील अनेक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘कैसे हुआ’, ‘पहले भी मैं’, ‘आज भी’ आणि ‘जानम’ यांसारख्या गाण्यांनी त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय ‘मांझा’, ‘रमता जोगी’ आणि ‘सौ ग्राम जिंदगी’ या गाण्यांनाही श्रोत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अलीकडे ‘टॉक्सिक’ चित्रपटातील ‘तबाही’ या गाण्यालाही त्याने आपला आवाज दिला आहे.
Emraan Hashmi: ‘आवारापन २’च्या यशाचा आनंद अन् इमरान हाश्मीला धक्का! ‘या’ आजाराचं निदान
गाण्यांच्या माध्यमातून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या विशालने आता त्याच कलेचा उपयोग गरजू लोकांसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळ आणि आसाममधील पूरग्रस्तांसाठी होणाऱ्या या कॉन्सर्टमधून किती मदत जमा होते, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. संकटात सापडलेल्या लोकांसाठी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.






