
things to keep in mind while buying life insurance after age 40 nrvb
आयुर्विमा विमा ही एक मूलभूत आर्थिक गरज आहे जी एखाद्याच्या आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग असावी.जीवन विमा एखाद्याच्या कुटुंबाचे आणि स्वतःचे अकाली मृत्यू आणि वृद्धत्व अशा दोन प्रकारच्या आर्थिक जोखमींपासून संरक्षण करण्यास मदत करते. कमावणाऱ्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबाला भविष्यातील उपजीविकेच्या खर्चासाठी धोका निर्माण होतो आणि खूप जास्त काळ किंवा वृद्धापकाळ जगण्याचा धोका म्हणजे सेवानिवृत्तीच्या काळात व्यक्तीची उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या कमी होते.
भविष्यातील उत्पन्नाचे रक्षण करणे हे कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्येक वयात अत्यंत महत्त्वाचे असते. त्याही पुढे जात व्यक्तीचे वर्तमान उत्पन्न, जीवनशैली आणि भविष्यातील गरजां लक्षात घेऊन आवश्यक असलेल्या संरक्षणाचे देखील वेळोवेळी मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
तरुण लोकसंख्येचा भारताला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. दरवर्षी ही “तरुण लोकसंख्या” वाढतच आहे. हे लक्षात घेता भारताची ही सर्वात मोठी मिलेनियल लोकसंख्या असून ती अंदाजे 426 दशलक्ष आहे, आणि एकूण भारतीय लोकसंख्येच्या तुलनेत हे परमन अंदाजे ३४ टक्के आहे आणि एकूण मनुष्यबळाच्या तुलनेत अंदाजे 47 % आहे. ही पिढी आता 40 वयोगटाकडे वाटचाल करत आहे. पुढील 10 वर्षांत या लोकसंख्येतील बहुसंख्य तरुणांनी चाळीशी गाठलेली असेलं. कोविड महामारीमुळे गेल्या 2 वर्षांत या पिढीमध्ये जागरूकता देखील वाढली आहे. आतापर्यंत विम्याला विरोध करणाऱ्या अनेक व्यक्ती आता विम्याबद्दल चर्चा करण्यासाठी आणि विमा खरेदी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.विशेषत: कुटुंबांसह गृहकर्ज सारख्या मह्त्वाच्या जबाबदाऱ्या असतानांही हा बहुतांश ग्राहक वर्ग 40 ते 45 वयोगटातील आहे.
या वयोगटात असताना विमा खरेदी करण्याचा विचार करत असताना एखाद्याच्या विमा गरजांचे मूल्यमापन करणे आणि सर्वोत्तम विमा उपाय ठरवणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
सध्या या वयोगटातील व्यक्ती कमावणाऱ्या आणि जास्तीत जास्त खर्च करण्यायोग्य उत्पन्न असल्याने त्यांचा आपल्यावरचे अवलंबित्व, भविष्यातील खर्च आणि जबाबदाऱ्या याबाबतचा दृष्टीकोन अधिक स्पष्ट असतो.अशा प्रकारे, एखाद्या व्यक्तीने यापूर्वी विमा सुरक्षा कवच घेतलेले नसेल अशा प्रकरणांमध्ये, कौटुंबिक गरजा सुरक्षित करण्यासाठी या टप्प्यावर ते घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. पण समजा एखादया व्यक्तीने आयुर्विमा पॉलिसी घेतलेली असेल तर त्यांनीही एखाद्याच्या “मानवी जीवन मूल्य” चे पुनर्मूल्यांकन करणे आणि अतिरिक्त संरक्षण घेणे आवश्यक आहे.
कोविडमुळे अचानक वाढवलेल्या चिंतेचा विचार सोडला तर गेल्या काही वर्षांमध्ये आयुर्मान वाढले असल्याचे दिसून येते. पण त्याच बरोबर उच्च राहणीमानाचा विचार केला तर स्वतंत्रपणे पुरेसे पेन्शन नियोजन करणे अधिक गंभीर बनले आहे. खरं तर, पेन्शन किंवा अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ४० हा वयोगट आदर्श आहे.
जोखीम क्षमतेचा विचार करुन टप्पे गाठण्यासाठी विशेषत: लहान मुलांशी जोडलेल्या भविष्यातील बचतीची आवश्यकता लक्षात घेऊन उपलब्ध असलेल्या बचत वजा संरक्षण संरक्षण योजनांचा विचार करू शकतात. या वयोगटात मुलांसाठी विमा पॉलिसी खरेदी करणे सर्वाधिक लोकप्रिय आहे.
ग्राहक गंभीर आजार रायडर्स, अपंगत्व आणि अपघाती मृत्यू यांसारख्या अतिरिक्त रायडर्ससह येणार्या योजना देखील घेऊ शकतात.हा वयोगट विविध जोखमींपासून संरक्षणाच्या गरजेबद्दल अधिक जागरूक आहे आणि अतिरिक्त खर्च असूनही अनेकजण अतिरिक्त फायद्यांसह योजनांचा शोध घेत असतात.
पॉलिसीच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून, विम्याची रक्कम घेतली जाते आणि प्रीमियमचा हप्ता तरुण व्यक्तीपेक्षा जास्त असू शकतो. शुद्ध मुदतीच्या कव्हरसाठी प्रीमियम ३०-३५ वयोगटातील व्यक्तीसाठी प्रीमियमच्या १.२ ते २ पट असू शकतो. तथापि, हे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे आहे की जोखीम देखील वयानुसार वाढते आणि प्रीमियम भरता येत असल्यास वाढलेले प्रीमियम पुरेसे जोखीम कव्हर घेण्यास बाधक नसावे.
ज्या मुदत कालावधीसाठी आयुर्विमा कवच घेतले जाते ते सहसा ग्राहकाच्या उत्पन्नाच्या वयाशी जुळलेले असते. तथापि,अशा अनेक पॉलिसी आहेत ज्या उच्च वयापर्यंत आणि अगदी संपूर्ण आयुष्यासाठी मुदत कवच देतात. उत्पन्नाच्या क्षमतेच्या आधारे निर्णय घेतला जाऊ शकतो.
वर नमूद केल्याप्रमाणे जोखीम वयानुसार वाढते आणि एखाद्या व्यक्तीला विम्याची रक्कम आणि मागील वैद्यकीय इतिहासावर अवलंबून वैद्यकीय तपासणी करावी लागते. ग्राहकाला वैद्यकीय आवश्यकतांची जाणीव असणे आणि कुटुंबाला दावा रकमेमध्ये भविष्यातील कोणतेही अडथळे टाळण्यासाठी अंडररायटिंग आवश्यकता पूर्ण करणे महत्त्वाचे ठरते.
हे एखाद्याच्या मानवी जीवन मूल्याच्या गणनेवर आधारित आहे आणि विद्यमान विमा पॉलिसी आणि गरजांवर देखील अवलंबून असू शकते. पुरेसा विमा नसल्यास एखाद्या दुर्दैवी प्रसंगाच्या बाबतीत कुटुंबाच्या भविष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
आपल्या खर्चात अतिरिक्त वाढ झालेली असली तरी कुटुंबासाठी विमा कवचाच्या माध्यमातून सुरक्षिततेचा लाभ घेण्यास कधीही उशीर होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.पण वयाची चाळीशी उलटून गेल्यानंतर विमा खरेदी करताना ग्राहकाने आपण निवडत असलेली विमा योजना आपल्या आर्थिक गरज पूर्ण करणारी आहे ना आणि आपल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारावर पुरेसे सुरक्षा कवच देण्यास सक्षम आहे की नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कॅस्परस जे.एच क्रोमहौट, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीराम लाइफ इन्शुरन्स