sessame oil (फोटो सौजन्य: istock)
हेल्दी ऑइलच्या लिस्टमध्ये प्रामुख्याने टिकच्या तेलाचा समावेश होतो. स्वयंपाकघरात तिळाच्या तेलाचा वापर आरोग्याला अनेक फायदे मिळवून देऊ शकतो. इतर तेलांच्या तुलनेत या तेलात अनेक आवश्यक पोषक घटक आढळली जातात, जी आरोग्यसाठी फार फायदेशीर असतात. तिळाच्या तेलाचा वापर अनेक प्रकारे करता येऊ शकतो. अनेकदा लोणचे बनवण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो. आयुर्वेदात तिळाचे तेल औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते.आरोग्याबरोबरच चेहऱ्याच्या त्वचेसाठीही याचा वापर केला जातो. चला तर मग तिळाच्या तेलाच्या फायद्यांविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हृदयरोगांसाठी चांगले
तिळाच्या तेलात अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असते. ज्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होऊन हे रक्तवाहिन्यांमधील चरबी जमा होण्यापासून प्रतिबंध करते. ज्यामुळे ह्र्दयाच्या समस्या कमी होतात आणि हृदयरोगाच्या समस्येचा धोकाही कमी होतो. तिळाच्या तेलात असंतृप्त फॅट्स आढळले जातात जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
त्वचेसाठी फायदेशीर
व्हिटॅमिन ई ने सम्रुद्ध तिळाचे तेल त्वचेच्या सौंदर्यवाढीसाठी फायदेशीर ठरते. त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी तिळाचे तरल एक उत्तम पर्याय आहे. कोणत्याही संकोचाशिवाय तुम्ही याचा वापर आपल्या दैनंदिन स्किनकेअर रुटीनमध्ये करू शकता. तिळाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव करता येतो.
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध
तिळाचे तेल अनेक अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत. ज्यामुळे जळजळची समस्या दूर होण्यास याची मदत मिळते. यातील फ्री रॅडिकल्समुळे शरीरातील पेशींना होणारे नुकसान कमी करण्यासाठी याची मदत मिळते. यामुळे जुनाट आजार आणि कॅन्सरसारख्या आजरांचा धोका कमी निर्माण जातो.
सांधेदुखीसाठी फायदेशीर
तीळामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांचे चांगले प्रमाण असते. यामध्ये तांबे, जस्त, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळली जातात. यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जी सांधेदुखीची समस्या दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर यामुळे सांध्यातील सूज दूर करण्यासाठी आणि हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
एक चमचा तिळाच्या तेलात खालील पोषक घटक असतात..