मासिक पाळी दरम्यान टॅम्पॉनन्स किंवा पॅड यापैकी कोणता आहे सर्वोत्तम पर्याय
मासिक पाळी दरम्यान योग्य गोष्ट निवडणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला आरामदायी वाटेल. टॅम्पॉनन्स आणि पॅड दोन्हीही पर्याय लोकप्रिय आहेत परंतु यापैकी कोणता पर्याय चांगला आहे? हा प्रश्न बऱ्याच वेळा महिलांना पडतो. यासाठी महिलांना पहिल्यांदा त्यांच्या शरीराची माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. कारण आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे हे माहित असणंही तेवढच महत्त्वाचं आहे. टॅम्पॉन हे व्हजायनल कॅनॉल च्या (योनी मार्गाच्या) आत घातले जाते. आणि तुम्ही खूप सक्रिय असाल तरीही ते आरामदायक आहे. आणि पॅड वापरण्यास अतिशय सोपे आहेत दोन्हीचेही त्यांचे फायदे आणि तोटे आहेत. टॅम्पॉन आणि पॅडमधील कोणता पर्याय योग्य आहे ते पहा. तुमच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार योग्य पर्यायाची निवड करा.
टॅम्पॉनचे फायदे
आरामदायी: टॅम्पॉन हा शरीराच्या आत घातला जातो. ज्यामुळे तुमच्यासाठी अधिक हालचाली करणे सोपे होते. जेव्हा तुम्ही टॅम्पॉन घालता तेव्हा ते बाहेरील कपड्यांमधून दिसत नाही. त्यामुळे अगदी तुम्ही कोणत्याही काळजीशिवाय पोहायला जाऊ शकता तसेच व्यायामही करू शकता.
दीर्घकालीन: टॅम्पॉन 4-6 तासांसाठी घालता येऊ शकते. म्हणून ते वारंवार बदलण्याची काही आवश्यकता नसते.
टॅम्पॉनचे तोटे
योग्यरित्या टॅम्पन घालणे: काही महिलांना टॅम्पन घालणे थोडेसे अवघड वाटू शकते. विशेषत: पहिल्यांदाच घालत असाल तरीही.
टॉक्सिक शॉक सिंड्रोम (टीएसएस): जर टॅम्पॉन बराच काळ घातला गेला तर त्यामुळे आतील भागात गंभीर संसर्ग होऊ शकतो.
रात्रीचा वापर: झोपताना टॅम्पॉन घालणे फारसे सुरक्षित मानले जात नाही. कारण ते 8 तासांपेक्षा जास्त काळ घालू नये.
पॅड्सचे फायदे
वापरण्यास सोपे: पॅड वापरण्यास अतिशय सोपे असते. विशेषतः तरुण महिला आणि मुली ज्यांना पहिल्यांदा मासिक पाळी येते त्यांच्यासाठी.
संसर्ग नाही: पॅडबाहेरून घातले जाते. त्यामुळे महिलांना अंतर्भागातील संसर्गाचा धोका कमी असतो.
दीर्घकाळ टिकणारे: काही पॅड 8-12 तासांपर्यंत टिकू शकतात. त्यामुळे तुम्हाला ते वारंवार बदलण्याची गरज नाही.
पॅड्सचे तोटे
हालचालींवर बंधने: पॅड घातल्याने बऱ्याच वेळा हालचाल करताना अडचण येते.
दृश्यमानता: घट्ट कपड्यांमुळे बऱ्याच वेळा पॅड लाईन्स दिसू शकतात. ज्यामुळे काही स्त्रियांना अस्वस्थ वाटू शकते.
रॅशेस: पॅड जास्त वेळ घालल्याने रॅशेस होतात. आणि त्यामुळे चिडचिड होऊ शकते.
कोणता पर्याय सर्वोत्तम आहे? हे पूर्णपणे आपल्या सोयी आणि प्राधान्यांवर अवलंबून असते. जर तुम्हालाही सतत बिझी राहायला आवडत असेल आणि त्याबरोबरच पोहणे किंवा व्यायाम करणे आवडत असेल तर टॅम्पॉन हा एक चांगला पर्याय असू शकतो. आणि जर तुम्हाला अधिक आराम हवा असेल तर पॅड हा पर्याय अधिक असू शकतो. दोन्ही उत्पादने आपापल्या परीने फायदेशीर आहेत. त्यांचा योग्य पद्धतीने वापर करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या शरीराच्या गरजा समजून घ्या आणि त्यानुसार योग्य पर्याय निवडा.