दरवर्षी मिस वर्ल्ड स्पर्धा ही वेगवेगळ्या देशात आयोजीत करण्यात येते. मात्र, या वर्षी होणारी ही स्पर्धा भारतीयांसाठी खास असणार आहे. या वर्षी मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा (Miss World 2023) भारतात होणार आहे. तब्बल 27 वर्षांनंतर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर देशाला पुन्हा ही सुवर्णसंधी मिळाली आहे. 1996 मध्ये देशाने शेवटच्या वेळी या स्पर्धेचे आयोजन केले होते. 8 जून ला दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
[read_also content=”‘मी एचआयव्ही पॉझिटिव्ह, कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत’, मीरा रोड हत्याकांड प्रकरणी आरोपी मनोज सानेचा नवा खुलासा https://www.navarashtra.com/maharashtra/mira-road-murder-case-accused-manoj-sanes-new-revelation-that-he-is-hiv-positive-never-had-physical-relations-nrps-413508.html”]
यावर्षी मिस इंडिया वर्ल्ड 2022 सिनी शेट्टी (Siny Shety) मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सात दशकांच्या इतिहासात दुसऱ्यांदा मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होणार आहे. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सध्या, त्याची अचूक तारीख आणि यजमान शहर अद्याप जाहीर केले गेले नाही, परंतु अशी अपेक्षा आहे की 71 वी मिस वर्ल्ड 2023 या वर्षाच्या शेवटी आयोजित केली जाऊ शकते.
मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरपर्सन आणि सीईओ ज्युलिया मोर्ले यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. ’71व्या मिस वर्ल्ड फायनलचे नवीन घर म्हणून भारताची घोषणा करताना मला आनंद होत आहे. 30 वर्षांहून अधिक काळापूर्वी मी या अविश्वसनीय देशाला भेट दिली तेव्हापासून मी भारताच्या प्रेमात पडलो. तुमची अनोखी आणि वैविध्यपूर्ण संस्कृती, जागतिक दर्जाची आकर्षणे आणि चित्तथरारक ठिकाणे याबद्दल जगाला कळालया हवं
आहेत 71व्या मिस वर्ल्डमध्ये 130 सुंदरी सहभागी होणार आहेत. मिस वर्ल्ड लिमिटेड आणि पीएमई एंटरटेनमेंटतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. विशेष म्हणजे मिस इंडिया वर्ल्ड 2022 सिनी शेट्टी या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.