amul milk
अमूलचं (Amul) दूध खरेदी करणं आता महाग होणार आहे. अमूलने भारतभर दूधाच्या दरवाढीची (Amul Increases Milk Prices) घोषणा केली आहे. आता अमूलच्या दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ (Amul Milk Price Increased By 2 Rupees)करण्यात आली आहे. गुजरातच्या अहमदाबाद आणि सौराष्ट्राच्या बाजारपेठेत अमूल गोल्डची किंमत ३० रुपये प्रति ५०० मिली असेल. दुसरीकडे, अमूल ताजाची किंमत २४ रुपये प्रति ५०० मिली तर अमूल शक्तीची किंमत २७ रुपये प्रति ५०० मिली असेल. या किमती १ मार्चपासून लागू होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
AMUL increases the price of milk by Rs 2. The prices will come into effect from tomorrow (March 1, 2022) pic.twitter.com/R2IeDQFtOo
— ANI (@ANI) February 28, 2022
[read_also content=”‘सैराट’च्या आर्चीचा ‘झुुंड’मध्ये रावडी लूक https://www.navarashtra.com/entertainment/archie-of-sairat-in-rawdi-look-in-zhund-nrsm-246776/”]
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी जुलै २०२१ मध्ये दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर ही दरवाढ लागू होणार आहे. यामध्ये टी-स्पेशल, सोना, ताजा, शक्ती याशिवाय गाय आणि म्हशीचे दूध इत्यादींचा समावेश आहे. तब्बल सात महिने २७ दिवसांनी दरात वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ हेच किमती वाढण्याचे कारण असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.