Andhra Pradesh : दसऱ्याच्या पारंपरिक लाठी-काठी युद्धाचा रक्तरंजित शेवट; एकाचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी, सौजन्य : आयएएनएस
लाठी युद्ध प्रत्येक वर्षी दसरा उत्सवाच्या निमित्ताने एका डोंगराळ ठिकाणी वसलेल्या मल्लेश्वर स्वामी मंदिरात आयोजित केले जाते. नेहमीप्रमाणे ग्रामस्थांनी पोलिसांच्या आदेशांना दुर्लक्ष करत याचे आयोजन केले होते. गावकऱ्यांच्या मते, हे त्यांच्या परंपरेचा भाग आहे.
या वार्षिक उत्सवाअंतर्गत वेगवेगळ्या गावातील लोकांचे दोन गट बनवले जातात. मध्यरात्री देवी मल्लम्मा आणि मल्लेश्वर स्वामी यांच्या प्रतिकात्मक विवाहानंतर दोन्ही गट देवी-देवतांच्या मुर्त्यांवर आपला अधिकार दाखवण्यासाठी लाठ्या काठ्यांनी लढाई करतात.
दोन्ही गटांनी पूर्ण उत्सफूर्तपणे या आयोजनात भाग घेतला. ही लढाई रोखण्यासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न केला, पण त्यांचे यात काहीच चालले नाही. नेरानी, नेरानी टांडा आणि कोथापेटा गावातील लोक एका गटात, तर अरिकेरा, अलूरू, सुलुवई, एलार्थी, निद्रावर्ती आणि बिलेहाल गावातील दुसरा गट यांच्यात तुफान हाणामारीला सुरुवात झाली.
दरम्यान, भक्त या जखमांना शुभ मानन्याची प्रथा आहे. दुसरीकडे, प्रशासनाच्या वतीने या लढाईच्या आयोजनावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी जास्तीची कुमक मागवली जाते, पण ग्रामस्थ या आदेशाला पायदळी तुडवत याचे आयोजन करतातच. यावेळी येथे एक हजार पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी येथे तैनात होते.
Ashutosh Ranka- Saurav Das Bail: CJP नेते आशुतोष रांका अन् सौरव दास यांना अखेर जामीन मंजूर
ग्रामस्थांच्या मते, भगवान शीवने भैरवनाथाचे रुप धारण केले होते आणि मणी तथा मल्लासुर नावाच्या दोन असुरांना लाठ्या काठ्यांनी तुडवलेले. त्याच प्रथेचे ग्रामस्थ विजयादशमीच्या दिवशी अवलोकन करतात. ‘राक्षस पक्षा’चा एक गट हा ‘देवता पक्षा’च्या गटाकडून देवांच्या मूर्ती हिसकावण्याचा प्रयत्न करतो. या मुर्त्या आपल्याकडे मिळाव्या म्हणून ते लाठ्या-काठ्यांचा वापर करतात.
ही पारंपारिक लढाई पाहण्यासाठी कुरनूलच्या जवळपासच्या जिल्ह्यातील, तेलंगाना आणि कर्नाटकसारख्या शेजारी राज्यातील हजारो लोक गावात जमा होतात.
Ans: कुरनूल जिल्ह्यातील देवरागाट्टू गावात दसरा उत्सवादरम्यान झालेल्या पारंपरिक लाठी-काठीच्या लढाईत एकाचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले.
Ans: आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील होलगोंडा मंडळातील देवरागाट्टू गावात हा उत्सव आयोजित केला जातो.
Ans: स्थानिक मान्यतेनुसार, भगवान शिवाने भैरवनाथाचे रूप धारण करून मणी आणि मल्लासुर या असुरांचा पराभव केला होता. या पौराणिक कथेशी संबंधित परंपरेचा भाग म्हणून विजयादशमीच्या दिवशी ही लढाई आयोजित केली जाते.






