Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान बहिणीला मुलगा साईनं केलं शिकार, मोठ्या बहिणीचं आसाराम बापू करीत लैगिंक शोषण, अननॅचरल सेक्ससह कोणकोणते गुन्हे सिद्ध?

ज्या तरुणीवर बलात्काराच्या आरोपात आसाराम बापू (Asaram Bapu) यांना दोषी ठरवण्यात आलंय. त्याच तरुणीच्या लहान बहिणीची नारायण साई (Narayan Sai) याने वासनांधतेत शिकार केल्याचंही समोर आलंय. कोर्टाने यापूर्वीच साईला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.

  • By साधना
Updated On: Jan 31, 2023 | 02:31 PM
asaram bapu and narayan sai

asaram bapu and narayan sai

Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद: कधी कोट्यवधी अनुयायी असलेले आणि संतत्वाचा डंका पिटवून घेणारे आसाराम बापू (Asaram Bapu) आणखी एका बलात्काराच्या आरोपात दोषी (Rape Case) ठरलेले आहेत. अशाच एका गुन्ह्यात झालेल्या शिक्षेत आसाराम बापू सध्या जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेप भोगत आहेत. या दुसऱ्या प्रकरणात सूरतमध्ये एका शिष्येवर बलात्कार आणि अप्राकृत्रिक सेक्स केल्याच्या आरोपांत त्यांना कोर्टानं दोषी ठरवलंय. मंगळवारी म्हणजे आज त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ज्या तरुणीवर बलात्काराच्या आरोपात आसाराम बापू यांना दोषी ठरवण्यात आलंय. त्याच तरुणीच्या लहान बहिणीची नारायण साई (Narayan Sai) याने वासनांधतेत शिकार केल्याचंही समोर आलंय. कोर्टाने यापूर्वीच साईला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.

[read_also content=”मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर, नवी मुंबईतल्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंची दांडी, सुरेश कुलकर्णींचा ‘हा’ आरोप, उत्तर भारतीय लॉबीही दुखावली https://www.navarashtra.com/maharashtra/suresh-kulkarni-angry-on-chief-minister-eknath-shinde-nrsr-365990.html”]

कोणकोणत्या गुन्ह्यांखाली आसाराम दोषी
दुष्कर्म, गुदामैथुन, छेडछाड, अवैध नियंत्रण मिळवणे, त्यासाठी बळाचा वापर करणे, गुन्हेगारी धमक्या देणे या सगळ्या अपराधात आसाराम बापू हे दोषी ठरलेले आहेत. या प्रकरणात आसाराम बापूची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती, मोटेरा आश्रमाचे पदाधिकारी ध्रुवबेन बालानी, जसवंतीबेन, निर्मला आणि मारी अशा सहा जणांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. या आरोपींविरोधात पुरावे मिळाले नसल्यानं त्यांची सुटका करण्यात आल्याचं आसाराम बापूंच्या वकिलांनी सांगितलं आहे.

सध्या जोधपूरच्या जेलमध्ये आसाराम
81 वर्षांचे आसाराम सध्या जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतायेत. राजस्थानातील आश्रमात आसारामच्या वासनांधतेची बळी पडलेल्या तरुणीनं 2013 साली बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आसाराम यांना कोर्टात हजर करण्यात आलं. प्रकृतीच्या काराणामुळं सूरतच्या हॉस्पिटलमध्ये आसाराम यांची पत्नी दाखल असल्यानं त्या कोर्टात हजर नव्हत्या. तर आसाराम यांची मुलगी कोर्टात पोहचण्यासाठी उशीर झाल्यानं कोर्टाला निर्णय देण्याआधी वाट पाहावी लागली होती. त्यावेळी कोर्टात वकिलांव्यतिरिक्त इतर कुणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. पॉक्सो कायद्यांतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर, सूरतची ही तरुणी समोर आली होती. 1997 ते 2006 या काळात तिच्यावर कसा अत्याचार करण्यात आला, हे तिनं सांगितलं. या तरुणीच्या लहान बहिणीवर लैगिंक शोषण केल्याच्या आरोपावरुन नारायण साई सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे.

Web Title: Asaram bapu raped older sister and his son raped younger sister found guilty nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2023 | 02:29 PM

Topics:  

  • asaram bapu

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.