
नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) सध्या घोंघावत आहे. या बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका आणखी वाढत चालला आहे. असे असताना आता गुरुवारी सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजताच्या दरम्यान हे चक्रीवादळ सौराष्ट्र, कच्छ जखाऊ पोर्ट आणि पाकिस्तानला धडकण्याची शक्यता आहे. यासोबतच कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट आणि मोरबी जिल्ह्यात हवेची गतीही 125 ते 145 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 74 हजार जणांचं स्थलांतर करण्यात आले असून, 442 गावांना अलर्ट जारी केला आहे.
#WATCH | Gujarat: Dwarka witnesses rough sea conditions and strong winds under the influence of #CycloneBiporjoy (Visuals from Bhadkeshwar Mahadev Temple) pic.twitter.com/Tyw2kVGOCE — ANI (@ANI) June 15, 2023
गुजरातमधील 8 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला असून, 9 राज्यांतही या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे. चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता प्रशासन सज्ज झाले असून, एसडीआरएफ, एनडीआरएफ, कोस्टगार्डसह लष्करही तैनात करण्यात आले आहे. चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकण्यापूर्वी गुजरात-महाराष्ट्राच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुजरातमध्ये 18 पथके सक्रिय
एनडीआरएफने या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्रात पथके तैनात केली आहेत. त्यानुसार, गुजरातमध्ये 18 पथके कार्यरत राहणार आहेत. याशिवाय दादरा आणि नगर हवेली तसंच दमण आणि दीव इथंही टीम हजर राहणार आहे. एनडीआरएफच्या 4 टीम गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात, तीन टीम राजकोट आणि तीन टीम द्वारकामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
9 राज्यांमध्ये प्रभाव
देशातील 9 राज्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे. गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफ. एसडीआरएफ, कोस्ट गार्ड व्यतिरिक्त मदत आणि बचावासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. 3.5 गुजरातमधील 7 जिल्ह्यांमधून 47 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
Disorganized Cyclone Biparjoy heading for landfall in Kutch Today Evening-Night near Jakhau Port. #CycloneBiporjoy pic.twitter.com/mT5CyRMXnN — 𝐖𝐞𝐚𝐭𝐡𝐞𝐫𝐦𝐚𝐧 𝐍𝐢𝐬𝐡𝐚𝐧𝐭 (@Cloudmetweather) June 15, 2023
महाराष्ट्रात 14 पथके तैनात
गुजरातच्या जामनगरमध्ये दोन, पोरबंदर, जुनागड, गीर सोमनाथ, मोरबी, वलसाड आणि गांधीनगरमध्ये प्रत्येकी एक टीम तैनात करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात 14 पथके तैनात करण्यात आली आहेत. यापैकी 5 मुंबईत तैनात करण्यात आले आहेत, तर उर्वरित अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहेत.
गुजरातशिवाय इतर 8 राज्यांनाही धोका
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुजरात आणि महाराष्ट्रासह 9 राज्यांना वादळाचा धोका आहे. लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि राजस्थान (पश्चिम) ही 9 राज्ये आहेत. या राज्यांना धोका असल्याचे म्हटले जात आहे.